Home महाराष्ट्र ई -पीक पाहणीची मुदत वाढविण्याची माण तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होतेय मागणी

ई -पीक पाहणीची मुदत वाढविण्याची माण तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होतेय मागणी

267

सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100

म्हसवड : माण तालुका हा कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो यंदाच्या वर्षी तर पाऊसाने दडी मारल्याने भयानक दुष्काळ जानवत आहे शेतकरी सुद्धा मेटाकुटीला आला आहे त्यातच शासनाने ई – पीक पाहणी ही ऑनलाईन पद्धतीने करावयास सांगितले आहे दुष्काळ आणि सध्य परिस्थिती पाहता यांस मुदत वाढ़ मिळावी अशी माण तालुक्यातील शेतकरी वर्गाकडूनमागणी होत आहे.

माण तालुक्यात भयानक दुष्काळ आहे खरीप पिके पूर्ती नष्ट होत आहेत. जे पीक शेतात उभे आहे त्या पिकाची वाढ़ खुंटली आहे काही पिके उन्हामुळे जळून नष्ट होत आहेत तालुक्यातील नंदी, नाले, विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत यातच महाराष्ट्र शासनाने ई -पीक पाहणीचे आदेश दिले असून ई -पीक पाहणी करणे बंधनकारक असून हे जरी खरे असले तरी 15 सप्टेंबरलाच यांची मुदत सम्पून गेली आहे त्या दिवसापासुन केवळ तालुक्यातील 40-45 टक्के शेतकऱ्यांचीच ई -पीक पाहणी पूर्ण झाली आहे उर्वरित शेतकरी ई -पीक पाहणी करु शकले नाहीत यांचे कारण शासनाने दिलीली मुदत फारच कमी आहे.
दुसरे कारण म्हणजे तलाठी किंवा सबधित कृषी अधिकारी व कृषी खात्याचे कर्मचारी यांनी काही ठराविक शेतकऱ्याच्या पिकाची पाहणी केली व बरेच शेतकरी सोडून दिले.तिसरे कारण म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांकडे अध्याप समार्ट फोन नाहीत त्यामुळे अशा शेतकऱ्यांना ई -पीक पाहणी करणे शक्य होत नाही काही ठिकाणी तर नेटवर्क सुद्धा नसते बऱ्याच वेळा ई -पीक पाहणी ऍप चे सर्वर डाऊनच असते अशावेळी शेतकरी ई – पीक पाहाणी कसा काय करणार असा शेतकरी वर्गातून सवाल येत आहे ई -पीक पाहणी न झाल्यामुले शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय योजना, सोसायटी कर्जे, बँकाची कर्जे आणि शासकीय अनुदान यांना वर्षभरासाठी का होईना मुकावे लागेल.
या सर्व बाबीचा विचार हाऊन शासनाने ई -पीक पाहणीची मुदत वाढवून द्यावी सद्या 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर दरम्यान राजस्व अभियान चालू आहे त्या अभियानाबरोबर ई -पाहणी सबधित नोंदीसाठी तलाठी, सर्कल, व कृषी सहायकाना आदेश देऊन तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांच्या पिकाची ई -पीक पाहणी करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here