Home महाराष्ट्र माय बाप हो दारू,बिडी, तंबाखू गुटखा, वरळी मटका हे व्यसन समाज पोखरणारी...

माय बाप हो दारू,बिडी, तंबाखू गुटखा, वरळी मटका हे व्यसन समाज पोखरणारी वाळवी-पी.एस.खंदारे

339

बळवंत मनवर/पुसद
___________________________
मोजे रामगाव येथील क्रांतिकारक बिरसा मुंडा गणेश उत्सव मंडळ आणि महिला मंडळाच्या वतीने आयोजित समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशिम शाखा कार्याध्यक्ष व संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषा करून अस्सल वर्हाडी भाषेत समाज प्रबोधन करणारे पी. एस. खंदारे यांचा अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसन मुक्ती, शिक्षण, ग्रामस्वच्छता, तंटामुक्त आदर्श गाव,सामाजिक सलोखा व महिला सक्षमीकरण तसेच शाळा वाचावी म्हणून सप्रयोग प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम सादर केला या वेळी पी एस खंदारे यांनी विविध संत समाज सुधारकांचे वैचारिक दाखले देत दारु, तंबाखू,गुटखा,बिडी, सिगारेट, गांजा व भांग आणि मटका जुगार आदी चे व्यसन हे केवळ एका व्यक्तीला शारीरिक व मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या बरबाद करतें असं नाही तर समस्त कुटुंब आणि समाजव्यवस्था देखील नासवण्याच काम करत असते, व्यसन हे कुटुंब आणि समाजाला लागलेली वाळवी आहे तिला समुळ नष्ट करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन क्रांतिकारक पाऊल उचलले आहे असे गौरवोद्गार काढले व राजर्षी शाहू महाराज यांचे महिला सक्षमीकरण करण्यासाठी चे पुस्तक भेट देऊन सत्कार केला.रामगावचा आदर्श गाव म्हणून ओळखले जावे म्हणून युवा वर्गाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.शिक्षित व नोकरदार मंडळींनी आपल्या गावातील लोकांना सामाजिक जाणीव ठेवून मदत होईल असे वर्तन करण्यासाठी आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात गाडगेबाबा यांच्या वेशभूषा करून गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या प्रेरणादायी गीताने रस्ता झाझत झाडत झाली, अध्यक्ष म्हणून रामगाव मोतसावंगा गावचे सरपंच महादेवराव सातपुते हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच प्रकाश नांदे, रमेश भोंडणे, विश्वासराव गोदमले, बाबाराव गोदमले,ग्यानुजी भोंडणे,किर्तनात संगिताची साथ संगत दशरथ मोरे महाराज,मानिकराव भोंडणे, अंबादास लडके, केशव बोंडे, रामजी खुळे, रमेश भोंडणे आदीनी दिली तर कार्यक्रमांचे प्रास्ताविक नाजुकराव भोंडणे यांनी केले तर सुत्रसंचलन रमेश मोरे यांनी केले आभार वसंतराव भोंडणे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिला मंडळासह क्रांतिकारक बिरसा मुंडा गणेश उत्सव मंडळ यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here