Home महाराष्ट्र मोर्शीचे तहसीलदार सागर ढवळे पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर ! ई पीक पाहनीची...

मोर्शीचे तहसीलदार सागर ढवळे पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर ! ई पीक पाहनीची जनजागृती करून शेतकऱ्यांना दिली माहिती !

144

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी /
मोर्शीचे तहसीलदार सागर ढवळे स्वतः मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी नोंदविण्याचे प्रशिक्षण देत असून ऑनलाईन ई पीक पाहणी भरण्यासाठी दापोरी येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांना सूचना केल्या. मोर्शी तालुक्याचे काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी तहसीलदार सागर ढवळे यांनी केले. शेतकऱ्यांना रब्बी पिकाचा पिक पेरा भरण्यासाठी मोबाईलद्वारे ई पिक पहाणी ॲप वर रब्बी पिका चा पेरा भरण्याची सुविधा देण्यात आली असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा या ॲपमुळे आता शेतकऱ्यांना तलाठ्या कडे जाण्याची गरज राहणार नाही नसल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पीक पेरा भरण्याचे मार्गदर्शन तहसीलदार सागर ढवळे यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले.
ई-पिक पाहणी नोंदविण्याअभावी शासकीय योजनांच्या व अनुदानाचे लाभापासून एकही शेतकरी वंचित राहू नये याकरीता प्रत्येक शेतकऱ्याने ई-पिक पाहणी या मोबाईल अॅपव्दारे ई-पिक पाहणी नोंदवावी याकरीता मोर्शी उपविभागामधील मोर्शी व वरुड तालुक्यांमध्ये दिनांक २३ व २४ सप्टेंबर २०२३ रोजी विशेष मोहीमेचे आयोजन केलेले आहे. या मोहीमेदरम्यान मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल हे प्रत्यक्ष शेतांत जावून शेतकऱ्यांना पिक पाहणी नोंदविण्याकरीता मदत करणार आहेत. तसेच तहसिलदार व नायब तहसिलदार हे गावांत भेटी देवून ई-पिक पाहणी विशेष माहिमेचे नियंत्रण करणार आहेत. उपविभागातील
सर्व शेतकऱ्यांनी या विशेष मोहीमेचा लाभ घेवून ई-पिक पाहणी नोंदणीचे काम १००% पूर्ण करावे, असे आवाहन
उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार, उपविभागीय अधिकारी तहसीलदार सागर ढवळे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी स्वत:च स्वतःच्या पिकाची नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन पीक पाहणी भरण्याची सुविधा सरकारने उपलब्ध केली आहे. पीक पाणी ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी २५ सप्टेंबर पर्यंत शासनाने मुदतवाढ दिली आहे. परंतु अनेक शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. हे ऑनलाइनचे पिक पाहणी भरण्याचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी मोर्शीचे तहसीलदार सागर ढवळे यांनी तालुक्यातील दापोरी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आपण आपल्या शेतातील पिकाची नोंदणी केली आहे का? अशी विचारणा केली. नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना लगेच नोंदणी करण्यासाठी सूचना दिल्या. यावेळी या कार्यक्रमाला तहसीलदार सागर ढवळे, तलाठी राधेश्याम राऊत, ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, यांच्यासह दापोरी परिसरातील शेतकरी व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

ऑनलाईन पीक पाहणी भरण्यासाठी शेतकऱ्यांनी, तरुणांनी पुढाकार घेऊन हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी यासाठी काम करीत आहेत. ऑनलाईन ई पीक पाहणी भरण्याच्या कामाला आम्ही प्राधान्य दिले असून मोर्शी तालुक्याचे काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे :- सागर ढवळे तहसीलदार मोर्शी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here