बल्लारपूर- महाराष्ट्रात तरूण बेरोजगार मुलामुलींची संख्या मोठ्या प्रमाणात असतांना व सरकारी कार्यालयामध्ये अनेक विभागात अनेक पदे रिक्त असतांना सरकारी पदभरती न करता कंत्राटी पद्धतीने सरकारी कर्मचारी नियुक्त करणे हे धोकादायक आणि असंवैधानिक आहे.
कंत्राटी नोकर भरती ही शासनाचा पैसा वाचविण्याच्या नावावर काही उच्चपदस्थ राजकारणी आणि कॉर्पोरेट लॉबीला फायदा करण्याचे हेतूने घेण्यात आला आहे. तसेच हा निर्णय म्हणजे गरीब,बेरोजगार आणि सुशिक्षित तरूणांच्या भविष्याशी थट्टा करणारा आहे. या सर्व गोष्टींची दखल घेऊन हा निर्णय त्वरीत रद्द करावा, तसेच अलिकडे पार पडलेल्या तलाठी भरतीमधील गोंधळा करिता जबाबदार लोकांची निष्पक्ष चौकशी करून कठोर कार्यवाही करावी.
या संदर्भात अपेक्षित निर्णय न झाल्यास संभाजी ब्रिगेड राज्यस्तरावर मोठे आंदोलन करेल. कंत्राटी पद्धतीने भरती होऊ देणार नाही.
याकरीता संभाजी ब्रिगेड बल्लारपूर तर्फे मान. तहसीलदार साहेब, बल्लारपूर यांना आज दिनांक २०/०९/२०२३ रोजी निवेदन देण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेड बल्लारपूर चे शहर अध्यक्ष साहिल घिवे, कार्याध्यक्ष संकेत चौधरी, सचिव निखिल वडस्कर, उपाध्यक्ष रीतीक कोंडलेकर, रोहित चूटे, प्रणय कष्टी, आमिर अहमद, निलेश सुर यासह इतर पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.