Home अमरावती पुरोगामी विचारांची चळवळ सतत तेवत ठेवा-प्रा.श्रीकृष्ण बनसोड ...

पुरोगामी विचारांची चळवळ सतत तेवत ठेवा-प्रा.श्रीकृष्ण बनसोड पुरोगामी प्रबोधन चळवळीची बैठक संपन्न

137

 

 

अमरावती ( वार्ताहर )
स्थानिक जिल्हा परिषद येथील रेस्ट हाऊस मध्ये पुरोगामी प्रबोधन चळवळीची बैठक सत्यशोधक प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीला प्रमुख अतिथी ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत तथा ज्येष्ठ लेखक डॉ. रमेश बीजेकर, ज्येष्ठकवी- नाटककार साहित्यिक शालिक जिल्हेकर, पुरोगामी चळवळीचे विदर्भ संयोजक रवि हाडे, नागपूर, अमरावती जिल्ह्यातील जेष्ठ कवी प्रा.अरुण बुंदेले, ज्येष्ठ साहित्यिक मा.शिवा प्रधान होते.

बैठकीचे अध्यक्ष समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी ” पुरोगामी चळवळीमध्ये सातत्य असणे फार महत्त्वाचे आहे. सोबतच तरुणांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा .आजचे युवक पुरोगामी चळवळीत सामील झाल्यास पुरोगामी चळवळ चळवळीचा विकास होईल.”असे विचार व्यक्त केले.

आज पुरोगामी संघटनांनी एकत्र येणे आवश्यक -डॉ.रमेश बिजेकर

” या देशामध्ये चाललेली सद्यस्थिती पाहता अनेक पुरोगामी संघटनांनी एकत्र येऊन पुरोगामी प्रबोधन चळवळ अधिक व्यापक करण्याची अत्यंत गरज आहे.” असे डॉ.रमेश बिजेकर यांनी व्यक्त केले.

“विषमता नष्ट करण्यासाठी पुरोगामी चळवळीची गरज- शालिक जिल्हेकर

” विषमता नष्ट करण्याकरिता पुरोगामी चळवळ फेडरेशन आवश्यक आहे. बळकट करण्यासाठी सर्व पुरोगामी विचारांच्या लोकांनी एकत्र येणे आवश्यक आहे.”असे मत श्री शालिक जिल्हेकर यांनी व्यक्त केले.

“पुरोगामी प्रबोधन चळवळ ग्रामा पर्यंत पोहोचणे आवश्यक-प्रा.अरुण बुंदेले

” पुरोगामी प्रबोधन चळवळीच्या सभा शहरांसोबतच ग्रामाग्रामात संपन्न झाल्या पाहिजे कारण ग्रामातील जनतेपर्यंत पुरोगामी प्रबोधन चळवळ पोहोचल्यास भारतात फार मोठी सामाजिक क्रांती घडू शकते.”
असे विचार प्रमुख अतिथी प्रा अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.

संविधानाचा जागर पुरोगामी चळवळीतून झाला पाहिजे -शिवा प्रधान

“पुरोगामी प्रबोधन चळवळ चालवित असताना सामाजिक क्रांतीचे आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले, भारताच्या समग्र सामाजिक चळवळीला एक समताधिष्ठित न्यायपूर्ण नीती संविधानातून देणारे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाचून पुरोगामी साहित्य निर्मिती करीत असताना पुढे जाता येत नाही. या अखंड भारताला एक शिस्त लावण्याची ताकद आणि भारत एकात्म ठेवण्याची ताकद संविधानात आहे. आपण संविधानाचा जागर या पुरोगामी चळवळीतून झाला पाहिजे आणि समग्र बहुजनांना या विचारधारेत आणले पाहिजे.”असे प्रतिपादन प्रमुख अतिथी अमरावतीचे ज्येष्ठ विचारवंत जीवन गौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी मा.शिवा प्रधान यांनी व्यक्त केले .

आज पुरोगामी विचारांची
जनजागृती आवश्यक – दिवाकर देशमुख

संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले यांचे पुरोगामी विचार तसेच पुरोगामी संत साहित्य, पुरोगामी विचारवंत व लेखक यांना आम्ही घराघरात पोचवलं पाहिजे ,यातूनच जनजागृती होईल.”असे विचार प्रमुख अतिथी श्री दिवाकर देशमुख यांनी व्यक्त केले.
सामाजिक कार्यकर्ते पंकज मेश्राम, पुरोगामी प्रबोधन चळवळ जिल्हा संयोजक चंद्रशेखर चतुर, सतीश मेहरे, कवी वासुदेव डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते रोशन डफाळे, रवींद्र फुले, अनिकेत डफाळेंसह सामाजिक कार्यकर्ते तथा संघटनेचे पदाधिकारी,समता सैनिक उपस्थित होते.बैठकीचे सूत्रसंचालन रोशन डफडे तर प्रास्ताविक विदर्भ संयोजक रवी हाडे नागपूर यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा संयोजक चंद्रशेखर चतुर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here