Home महाराष्ट्र एस व्ही आढावे व व्ही टी माळी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान...

एस व्ही आढावे व व्ही टी माळी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान !…

61

 

धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर

धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक एस व्ही आढावे व व्ही टी माळी यांना जळगाव येथे अल्पबचत भुवन येथे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्कार हा मोशन फाउंडेशन व एम.आय.टी.कोटा या संस्थेमार्फत जे शिक्षक JEE व NEET या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करतात व या परीक्षांचे महत्त्व सातत्याने पटवून देतात अशा जिल्ह्यातील शिक्षकांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सदर पुरस्कार वितरण वेळी संस्थेचे अध्यक्ष संचालक मा.भूतंडा साहेब, विभागीय संचालक किरण पाटील तसेच जैन समूहाचे व्यवस्थापक जोशी साहेब व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
धरणगाव तालुक्यात महात्मा फुले हायस्कूलचे उपशिक्षक व्ही.टी.माळी व एस.व्ही.आढावे यांना हा मानाचा पुरस्कार जळगाव जिल्हाधिकार्यालय येथील अल्पबचत भवन येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराने ऊर्जा मिळते असे प्रतिपादन माळी व आढावे यांनी केले. या दोन्ही शिक्षकांचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here