सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100
म्हसवड : जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व याला जबाबदार असणाऱ्या लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची चौकशी होऊन कारवाई करणेत यावी या मागणीचे निवेदन माण तालुका वंचित बहुजन आघाडिच्या वतीने तहसीलदार यांना देणेत आले
या निवेदनात म्हटले आहे ki
आंतरवली, सराठी जिल्हा जालना या ठिकाणी आरक्षण मागणीसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी जो अमानुष लाठीमार केला त्यातून महिलांना देखील सोडले नाही ही बाब अत्यंत निंदनीय असून याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत.
ही दडपशाही असून लोकशाही कडून हुकूमशाहीकडे या देशाची वाटचाल सुरू आहे.साखरसाम्राट,शिक्षण सम्राट व काही प्रस्थापित राजकारणी सोडले तर उर्वरित अल्पभूदारक शेतकरी,मजुरीवर उपजीविका करणाऱ्या मराठा समाजाची स्थिती दयनीय आहे त्यांना आरक्षण मिळणे हा त्यांचा अधिकार आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे.
गेली 33 वर्ष आरक्षणाच्या मागणीसाठी सनदशीर मार्गाने लढा सुरू आहे परंतु सत्ताधाऱ्यानी कायम फसवणूक केली आहे.एका बाजूला आरक्षण जाहीर करावयाचे ,त्याच आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका दाखल करायला लावायची व त्यावर स्थगिती मिळवायची त्याविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागायची पण कोर्टात सरकारच्या वतीने ठामपणे बाजूच मांडायची नाही हा सरकारचा दूटप्पीपणा आता उघड झाला आहे.
आता तरी महाराष्ट्र तील शिंदे फडणवीस सरकारने मराठा समाजाला कायम टिकनारे आरक्षण द्यावे व जालना या ठिकाणी आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची चौकशी होऊन याला जबाबदार असणारे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचेवर कारवाई कडक करावी अशी मागणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करीत आहोत
यावेळी निवेदन देताना श्री.सनी पोपट तुपे
युवा जिल्हाध्यक्ष
वंचित बहुजन युवा आघाडी सातारा,श्री.युवराज बबन भोसले,
अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी माण,श्री.बाळासाहेब रणपिसे ,मा.सभापती,वंचित सल्लागार वंचित बहुजन आघाडी माण,श्री.बजरंग वाघमारे, सरचिटणीस वंचित बहुजन आघाडी माण,श्री.राजेंद्र आवटे, सहसचिव वंचित बहुजन आघाडी माण, श्री.अंकुश किसन नामदासआदी पदाधिकारी उपस्थित होते.