Home Breaking News 76व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन

76व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन

120

✒️बारामती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

  बारामती(दि.3सप्टेंबर):- संत निरंकारी मिशनचा 76वा वार्षिक अध्यात्मिक संत समागम समालखा येथील विशाल मैदानावर सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात भव्य-दिव्य रूपात 28 ते 30 ऑकटोबर दरम्यान आयोजित केला जाणार आहे.

या पावन संत समागमामध्ये देश-विदेशातील लाखो भाविक भक्तगण सहभागी होऊन संत समागमाचा भरपूर आनंद प्राप्त करतानाच सद्गुरुचे साकार दर्शन व पावन आशीर्वाददेखील प्राप्त करणार आहेत.या वर्षी निरंकारी संत समागमाचा मुख्य विषय आहे- ”शांती :  अंतर्मनातील” असा आहे. या विषयावर देश-विदेशातून सहभागी होणारे गीतकार, कवी, वक्तागण आपले शुभभाव गीत, कविता व विचारांच्या माध्यमातून व्यक्त करतील. विविध भाषांतून केलेल्या या प्रस्तुतींचा आनंद सर्व श्रोत्यांना प्राप्त होईल.

सर्वविदित आहे, की निरंकारी संत समागमाच्या पावन आगमनाची प्रतीक्षा देश-विदेशातील भाविक – भक्तगणांना असते.हा संत समागम निरंकारी मिशनकडून दिला जाणारा सत्य, प्रेम व शांतीचा दिव्य संदेश जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचे एक सशक्त माध्यम आहे ज्याद्वारे आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून अवघ्या विश्वामध्ये समानता, सौहार्द व प्रेम यांचे सुंदर स्वरूप प्रदर्शित होते. वर्तमान समयाला याची नितांत गरज आहे.

सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज ब्रह्मज्ञानाचा हा दिव्य प्रकाश विश्वाच्या कानाकोपऱ्यात एका नवऊर्जेने संचारित करत आहेत. हा दिव्य संत समागम शांति, समरसता, विश्वबंधुत्व आणि मानवीय गुणांचे एक असे सुंदरी प्रतीक आहे ज्याचे एकमेव लक्ष्य ‘सद्भावपूर्ण एकत्व’ तसेच शांतीची भावना पसरविणे हा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here