✒️बडनेरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
बडनेरा(दि.1सप्टेंबर):–राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती महानगरपालिका व विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी द्वारे संचालित प्रा. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट बडनेरा आणि समाजकार्य महाविद्यालय बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमाने “ मेरी माटी मेरा देश ” मोहिमेअंतर्गत वृंदावन कॉलनी गोपाल नगर परिसर अमरावती येथे महानगरपालिकेच्या उद्यानामध्ये अमृतवाटिका तयार करण्यात आली. ज्यामध्ये २१०० विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
महानगरपालिका आयुक्त श्री देविदास पवार सर डॉ. राजेश बुरंगे संचालक राष्ट्रीय सेवा योजना अमरावती विद्यापीठ, वृक्षरोपी प्रेमी श्री ए. एस. नाथन, प्रा. शुभम कदम कार्यक्रमाधिकारी राष्ट्रीय सेवा योजना प्रा. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट बडनेरा तसेच शिवाजी तुपेकर कार्यक्रमाधिकारी राष्ट्रीय सेवा योजना समाज कार्य महाविद्यालय अमरावती यांच्या उपस्थितीत पार पडला. 350 राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी या ठिकाणी वृक्षरोपण केले व सुंदर अशी स्वास्तिक आकारामध्ये वृक्ष वाटिका तयार केली. यावेळी श्री श्री ए. एस. नाथन, यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले.