Home महाराष्ट्र वढा येथील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

वढा येथील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

177

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि. 28 ऑगस्ट) :-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वढा येथील विद्यार्थ्यानी शिष्यवृत्ती परीक्षा 2023 मध्ये प्राविण्य मिळविल्याबद्दल रंजन सामाजिक मंच चंद्रपूरच्या वतीने वढा येथील रंगमंचावर भव्य सत्कार तथा गुणगौरव सोहळा साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच किशोर वरारकर, सत्कारमूर्ती लोचन वरारकर, मयंक मोहिजे, निशा वरारकर, प्रमुख पाहुणे रंजन सामाजिक मंचाचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, शाळा सुधार समिती अध्यक्ष अशोक हागे, मोहन जीवतोडे, वसंत भलमे,बबन धनेवार,कार्तिक वरारकर, एकनाथ मोहिजे, मंगला दुर्वे, माला जेनेकर, कविता गोहकर, सुदर्शन नैताम, प्रवीण मडावी, आदीं उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणाले वडा येथे जिल्हा परिषद शाळेत नैताम सर व मडावी सर आले तेव्हापासून मुलांना चांगल्या सवयी लागल्या.

अभ्यासात सुधारणा झाले मुलांच्या वागणुकीत चांगलाच बदल घडून आलेला दिसतोय. त्यांच्या मार्गदर्शनात तीन मुले शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत त्यामुळे आमच्या गावाचे नाव सुद्धा झाले आहे मुलांनी अभ्यासाचा ध्यास घेतल्यास यश नक्कीच मिळतो “कोशिश करने वाले की हार नही होती” असे त्यांनी म्हटले. डॉ नंदकिशोर मैंदळकर म्हणाले मुलांच्या यशस्वी ते करिता शिक्षक आई-वडील व विद्यार्थी या तिघांनीही मिळून मुलावर लक्ष केंद्रित केले तर मुलाला नक्कीच यश संपादन करता येते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना आव्हान आहे की पुढील वर्षी कमीत कमी दहा विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण व्हायला पाहिजे.

याकरिता शिक्षक पालक व विद्यार्थी यांनी कठोर मेहनत घ्यायला हवी व आपल्या वढा या गावाचे नाव उज्वल करण्यास प्रयत्न करायला हवे. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण मडावी प्रास्ताविक सुदर्शन नैताम आभार प्रदर्शन मोहन जीवतोडे यांनी केले. विद्या पवार, गणेश मोहिजे, बापूराव गोहोकर,माधुरी वरारकर, साईनाथ येलमुले बाबा चीने,भीमराव भगत यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here