Home महाराष्ट्र धनजच्या आरती डिगाबंर साबळे यांची कृषी अधिकारी पदी निवड

धनजच्या आरती डिगाबंर साबळे यांची कृषी अधिकारी पदी निवड

172

✒️अमोल जोगदंड(विशेष प्रतिनिधी)मो:-8806583158

धनज(दि.26ऑगस्ट):- आयुष्यात प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनाचे ध्येय ठरवीत असतो. परंतु फार कमी लोक निश्चित ध्येयापर्यंत पोहोचत असतात. आत्ताच नाही तर मी समजतो की जेव्हापासून आपण स्वतंत्र झालो, तेव्हापासून प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असतं की आपल्या मुलांनी सरकारी नोकरीत लागावं आणि देशाची सेवा करावी .लाखो विद्यार्थी परीक्षा देतात आणि काही मूठभर हे सौभाग्य प्राप्त करतात. देशाची सेवा जनतेची सेवा करण्याचं मला वाटते याच्यापेक्षा दुसरं सौभाग्य नाही.

की आपल्या मनात जर देशाची सेवा करण्याची इच्छा असेल लोकांची सेवा करण्याची असेल तर लोकसेवा आयोगाच्या सिव्हिल सेवा याच्यांपेक्षा दुसरी संधी नाही. अशा लोकांमध्ये उमरखेड तालुक्यातील धनंज या छोट्याशा खेड्यातील रहिवासी आरती डिगाबंर साबळे या तरुणीची गणना करावी लागेल. धनज या छोट्याशा खेड्या तील आदिवासी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या येथीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण, तर जवाहरलाल नवोदय विद्यालय घाटंजी यवतमाळ येथे माध्यमिक ,तर डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अमरावती येथील पदवीचे शिक्षण मिळाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून वर्ग दोन च्या तालुका कृषी अधिकारी पदापर्यंत आरती ने झेप घेतली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात आरती डिगाबंर साबळे यांची तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाली आहे .गावात सुविधा नसताना आरतीने अत्यंत चिकाटीने आपले ध्येय पूर्ण केले .एक वेळा महाराष्ट्र आयोगाच्या परीक्षेत अपयश आले परंतु ध्येय गाठण्याच्या जिद्दीमुळे आरतीने आखेर महाराष्ट्र कृषी सेवा आयोगाच्या 2022 च्या अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून चौथी रँक मिळवली आहे. कृषी अधिकारी पदी निवड झालेली आरती डिगाबंर साबळे ह्या या पदी पोहोचलेल्या गावातून एकमेव उमेदवार आहेत.

शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक हितोपयोगी कार्य करण्याचा मानस आरती यांनी माझ्याशी बोलताना व्यक्त केला .आई वडील माझे सगळ्यात मोठे प्रेरणास्थान आहेत. ज्यांनी पदोपदी माझ्या प्रत्येक प्रयत्नाला मोलाची साथ दिली. त्यामुळे या यशाचे मानकरी माझे आई वडील आणि माझा भाऊ व शिक्षक आहेत आसे सांगितले.गावातील सर्व स्तरावरून आरती साबळे यांची तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here