Home गडचिरोली काँग्रेस करणार जनसंवाद पदयात्रा ; भाजप सरकारचे अपयश आणनार चव्हाट्यावर

काँग्रेस करणार जनसंवाद पदयात्रा ; भाजप सरकारचे अपयश आणनार चव्हाट्यावर

386

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.25ऑगस्ट):- वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत असून याला जबाबदार केंद्रातील भाजप आणि राज्यातील ED सरकार आहे. या सरकारच्या हुकुमशाही धोरणामुळे अनेक स्वायत्त संस्थांचे अधिकार हिरावल्या जात असून त्यामुळे संविधानाची पायमल्ली केल्या जात आहे. जाती जातीत – धर्मा धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे.

यामुळे विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी, लघु व्यापारी, सर्व त्रस्त असून या हुकमशाही सरकारच्या हिटलरशाही धोरणाचा परदाफास करून जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस च्या वतीने राज्यभरात जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आ. नाना पटोले, विरोधी पक्ष नेते माजी मंत्री आ. विजयभाऊ वड्डेट्टीवार, अखिल भारतीय स्तरावरील नेते मंडळी आमदार अभिजित वंजारी ,आमदार सुधाकर अडबाले प्रदेश स्तरावरील नेते मंडळी सहभागी होणार आहेत. या पदयात्रेची सुरुवात गडचिरोली जिल्ह्यात 3 सप्टेंबर पासून विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध ऐतिहासिक मार्कडा येथून होऊन पुढे चामोर्शी – गडचिरोली – आरमोरी मार्गे वडसा तालुक्यात पोहचणार असून याच्या नियोजना करिता शासकीय विश्राम भवन गडचिरोली येते गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, जि.प. माजी उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन नाट, शहराध्यक्ष सतीश विधाते, महिला अध्यक्ष कविता मोहरकर, काँग्रेस नेते जेसा मोटवाणी, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, चामोर्शी तालुकध्यक्ष प्रमोद भगत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, वडसा तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, रमेश चौधरी, प्रभाकर वासेकर, परसराम टिकले, अब्दुलभाई पंजवाणी, वामनराव सावसाकडे, जयंत हरडे, नंदू नरोटे, अनिल कोठारे, पांडुरंग घोटेकर, राजेश ठाकूर, भारत येरमे, दत्तात्रय खरवडे, केसरी उसेंडी, दिलीप घोडाम, दिवाकर निसार, देवाजी सोनटक्के, काशिनाथ भडके, वैशाली ताटपल्लीवार, कविता भगत, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, रजनी आत्राम, समिता नंदेस्वर, विद्या कांबळे, आरती लहरी, नितीन राऊत, योगेंद्र झंजाळ, महेश जिलेवार, संजय चंने, प्रभाकर कुबडे, भैयाजी मुद्दमवार, तेजस मडावी, सुमेध तुरे, निकेश गदेवार, श्रीकांत कथोटे, उत्तम ठाकरे, दीपक रामने, आय. बी. शेख, सुरेश भांडेकर, टिकाराम सहारे, प्रफुल आंबोरकर, नृपेश नांदनकर, रमेश धकाते, मदनालाल टापरे, सुदर्शन उंदीरवाडे, संदीप वाघाडे, राजेश नैताम, हेमंत कुमरे, बाबुराव गडसूललवार, दादाजी देशमुख, योगेंद्र झंजाळ, राजू रणदिवे, प्रकाश तुंबडे, दिलीप वनकर, सदाशिव कोडापे, हेमंत मोहितकर, सलिम शेख, अनिल किरमे, सप्नील ताडाम, सुभाष धाईत, अरविंद पटाले, लालाजी सातपुते सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी या बैठकिला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here