विशेष प्रतिनिधी(सौ.अश्विनी मयूर जोशी)मो:-9767733560 /7972344128
परभणी(दि.25ऑगस्ट):– जिंतूर तालुकास्तरीय विज्ञान मेळावा कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जिंतूर येथे घेण्यात आला. या मेळाव्यात इयत्ता आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या मेळाव्यात “भरडधान्य – एक उत्कृष्ट पौष्टिक आहार की आहार भ्रम” या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. शैक्षणिक साहित्याचा वापर करून आपला विषय योग्य प्रकारे व निर्भीडपणे विद्यार्थ्यांनी मांडला. नेमलेल्या परीक्षकांनी निश्चित केलेल्या निकषानुसार गुणदान करण्यात आले.
यानुसार प्रथम क्रमांक प्रगती दिलीप खिल्लारे (सरस्वती माध्यमिक शाळा गडदगव्हाण), द्वितीय क्रमांक वेदिका विठ्ठल घुगे(न्यू इरा इंग्लिश स्कूल सीबीएससी, जिंतूर ), तृतीय क्रमांक कल्याणी प्रेमसुख बोराळकर (श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर कन्या विद्यालय जिंतूर) तसेच उत्तेजनार्थ दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. हर्षदा गणेश रूघे, (जवाहर विद्यालय, जिंतूर) श्रीधर भानुदास काळे (ज्ञानेश्वर विद्यालय, जिंतूर) सर्व सहभागी विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी गणेश गांजरे यांनी सहभागाबद्दल आकर्षक प्रमाणपत्र दिले.
गटशिक्षणाधिकारी गणेश गांजरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानोबा साबळे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष आमले, शालेय पोषण आहार अधीक्षक त्र्यंबक पोले, यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर कनिष्ठ महाविद्यालयाचे आदाबे जी. ए. व श्रीमती लोणे बी.पी. यांच्यासह गट साधन केंद्रातील श्रीमती संगवई, श्रीमती तोडकर, श्री प्रधान, गायकवाड, पेठे ,फड , राठोड , मुंढे यांनी परिश्रम घेतले.