Home महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने भाजपा मध्ये पक्षप्रवेश

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने भाजपा मध्ये पक्षप्रवेश

121

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपूरी(दि.25ऑगस्ट):-भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कुरझा वॉर्डमधील किरणभाऊ फटींग यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षा मध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्यात आला.

प्रवेशकर्ते किरण भाऊ फटींग ,राकेश वैद्य ,राजू बावनकुळे,कुलदीप चिलबुले ,दुर्गेश पिसे, रजत थोटे, शुभम थोटे ,शरद टिकले ,वैभव पडोळे ,प्रवीण जिभकाटे,अनिकेत उराडे,आकाश फटिंग ,समीर जीभकाटे ,संदीप टिकले,योगेश लांजेवार,कुणाल बावनकुळे ,रुपेश टिकले, गोलू दिवटे,चेतन लाखे,पिंटू भुरे ,तेजस उराडे, परीस खेत्रे, वसंता खेत्रे, विक्रम कावळे, रमेश भाऊ जिभकाटे ई. तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी लोकसभा प्रवासात बुधवारी 23 ऑगस्ट रोजी ते गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचा दौरा करण्यात आला.

या प्रवासात ते गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील सर्व 6 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून व “संपर्क से समर्थन” अभियानात भाग घेतला. बह्मपुरीच्या लोढीया हॉलमध्ये सहभागी होऊन ब्रह्मपुरी – चिमूर व आमगाव विधानसभा क्षेत्रातील भाजपा प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here