Home महाराष्ट्र मनसे सैनिक धडकले सा बां विभाग कार्यालयावर

मनसे सैनिक धडकले सा बां विभाग कार्यालयावर

112

(रिकाम्या खुर्चीवर लावले बेशरमांची झाडे)

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि. 24 अगस्ट):-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय महामार्ग ,राज्यमार्ग प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यातील तसेच विविध रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याकरिता महाराष्ट्रभर आंदोलन छेडले आहे त्याच आंदोलनाचे पडसाद म्हणून येथील मनसे सैनिकांनी दि.23 ऑगस्ट रोजी येथील सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालयात अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीवर बेशरमाचे झाडे लावून निषेध केले.

गेल्या अनेक दिवसांपासून शहरात नव्हे तर तालुक्यातील रस्त्यावर खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे नागरिकांना या खड्याचा अतोनात त्रास होऊन विविध आजाराला सामोरे जावे लागत आहे.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या उमरखेड ते पळशी फाटा, मुळावा, ढाणकी पुसद रोड ची कामे तात्काळ पूर्ण करा करिता निवेदन देण्यासाठी गेलेल्या मनसे सैनिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी गैरहजर असल्यामुळे संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांच्या दालनातच बेशरमाची झाडे लावून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

याप्रसंगी मनसे सैनिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करीत प्रशासनाचे जाहीर निषेध केले येत्या 8 ते 10 दिवसात या रस्त्याची कामे तातडीने पूर्ण न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहर अध्यक्ष संजय पाटील बिजोरे यांनी दिला.

यावेळी मनसे जिल्हाउपाध्यक्ष डेव्हिड शहाणे,शहर अध्यक्ष संजय पाटील बिजोरे, संदीप कोकाटे,प्रवीण भीमटे,प्रविण कनवाळे, अमोल लांबटिळे, अनुराग जोगदंड, लक्ष्मण वांगे,शरद सूर्यवंशी, प्रवीण इंगळे, नंदकिशोर देवसरकर,कैलास कावडे यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here