


🔹शासनाकडून मिळवून दिला शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना धनादेश
✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)
जिवती(दि.22ऑगस्ट):-तालुक्यात शेतकरी आत्महतेचा सत्र सुरूच आहे, या शेतकऱ्याकडे कोणतेही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही, सद्या तालुक्यात गोरगरिबांचा कैवारी, शेतकऱ्यांचा हितचिंतक म्हणून सुदामभाऊ राठोड यांची नव्याने ओळख निर्माण झाली आहे.
फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून सुदामभाऊ राठोड शेतकऱ्यांसाठी काम करत असतो त्यांची समस्या सोडवण्यासाठी रात्र दिवस झटत असतो.
सोपान मोकिंदा कागणे रा. पुडीयाल मोहदा, वकील गोपीनाथ चव्हाण रा. धोंडाअर्जुनी, बापूराव गणपती मुंडे रा. राहपली खुर्द या तीनही शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना सुदामभाऊ राठोड यांनी पाठपुरावा करून शासनातर्फे धनादेश मिळवून दिला.













