✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830
चिमूर(दि.22ऑगस्ट):- महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्माचारी ( सेवेच्या शर्ती ), नियम क्र.१९ मध्ये शिक्षकांना सेवानिवृत्ती वेतन मिळत आहे परंतू जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना सुरू करण्याचे वेगळे शासकीय परिपञक काढून शिक्षकांची पेन्शन दि.१ नोव्हेंबर २००५ पासून बंद करण्यात आली. नियमावलीतील नियम अजुनही रद्द करण्यात आला नाही. परंतू शिक्षकांची पेन्शन बंद करण्यात आली. हा नियम रद्द करण्याचा प्रस्ताव विधीमंडळात येणार होता तेव्हा त्यावर आपण आमदार असताना तक्रार दाखल करून आक्षेप नोंदविला आहे. त्यामुळे तो अजुनही रद्द झाला नाही.
शिक्षकांना निवृत्ती वेतन मिळावे यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले व आताही करित आहो .जोपर्यंत शिक्षकांना पेन्शन मिळणार नाही, तोपर्यंत मी स्वःत आमदारकीच्या कार्यकाळाची पेन्शन घेणार नाही हे आपण यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे. तसेच शिक्षकांचे अनेक प्रश्न पूर्ण करण्यासाठी कोणते प्रयत्न केले व कोणत्या प्रश्नात यश मिळाले याचे विवेचन चिमूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या अभ्यासवर्ग व तालुका मेळाव्याच्या भाषणातून माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने सर्व कर्मचार्यांच्या झालेल्या संपाला पाठिंबा दिला व सक्रिय सहभाग घेतला. शिक्षकांच्या निवृत्ती वेतनासंदर्भात महाराष्ट्र शासनाला अनेक निवेदने दिलेली आहे.आपण अजुनही या मागणीच्या पाठिशी आहो व कायदेशीर लढाईही लढत आहो. एक दिवस यात यश प्राप्त होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाआहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चिमूर तालुक्याच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला होता.यामध्ये शिक्षण कायदा १९७७ व सेवाशर्ती नियमावली १९८१ सेवाजेष्ठता, शासकीय परिपञकाचे अर्थपूर्वक मार्गदर्शन व जुनी पेन्शन योजना सद्यस्थिती, रजा नियम, काॅन्व्हेण्ट शिक्षकांच्या समस्या, संघटना कार्यकर्ता प्रबोधन व मार्गदर्शन, अभिवेदन, निवेदने सादर करण्याची पद्धत इ. विषयावर चर्चासञे झाली. शिक्षक परिषदेच्या तालुक्यातील निवृत्त ३० कार्यकर्त्यांचा सत्कार घेण्यात आला.
विचारमंचावर राज्य कार्यकारिणी सरकार्यवाह राजकुमार बोनकीले व राज्याच्या महिला आघाडी प्रमुख पुजाताई चॊधरी विभागाचे अध्यक्ष अजय वानखेडे,उपाध्यक्ष विनोद पांढरे, मधुकर मुप्पीडवार, कोषाध्यक्ष संजय सुरावार सहसंघटनमंञी रामदास गिरटकर, उदघाटक राजू पाटील झाडे, स्वागताध्यक्ष एकनाथ थुटे, चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष विलास खोंड, कार्यवाह दिलीप मॅकलवार कोषाध्यक्ष बोरकर, प्रसिद्धीप्रमुख राजेंद्र मोहितकर, कार्यालयमंञी विलास वरभे महिला आघाडी प्रमुख कु. संध्या गिरडकर केंद्रप्रमुख तुळशीराम महल्ले, मुख्याध्यापक संघाचे सचिव विनोद पिसे इ.उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.कु. प्रज्ञा पिसे,प्रास्ताविक राजेंद्र मोहितकर, अहवालवाचन कार्यवाह परमानंद बोरकर, आभारप्रदर्शन अध्यक्ष प्रमोद धारणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष प्रमोद धारणे, कार्यवाह परमानंद बोरकर, सहकार्यवाह एम.एन.पठाण, मार्गदर्शक नरहरी कापसे, विलास वरभे,संध्या गिरडकर, ठाकरे, समर्थ, वाघे, शिल्पा ढाकुणकर, वैष्णवी बोढे, विनोद खमिले, पेचे आदींनी परिश्रम घेतले.