Home महाराष्ट्र बस स्थानकाचे काम पूर्णत्वास गेल्याशिवाय आंदोलन सोडणार नाही – अजिनाथ केवटे

बस स्थानकाचे काम पूर्णत्वास गेल्याशिवाय आंदोलन सोडणार नाही – अजिनाथ केवटे

178

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

🔸म्हसवडकराचा आंदोलनाला वाढता पाठिंबा

म्हसवड(दि.19ऑगस्ट):-दहिवडी एस.टी. आगाराला सर्वाधिक अर्थिक उत्पन्न मिळवुन देणार्या म्हसवड एस.टी. बसस्थानकाचे नुतनीकरणाचे रखडलेले बांधकाम त्वरीत सुरु करावे अशी मागणी म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते व रिपब्लिकन सेनेचे माण तालुका अध्यक्ष अजिनाथ केवटे यांनी करीत यासाठी म्हसवड बसस्थानकाशेजारी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

म्हसवड एस.टी. बसस्थानकाची अत्यंत दुरावस्था झाल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, या दुरावस्थेला एस.टी. प्रशासन जबाबदार असुन गत १२ वर्षा पासुन या बसस्थानकाच्या नुतनीकरणाचे काम सुरु आहे मात्र ते काम पुर्णपणे ठप्प झाल्याने एस.टी. बसस्थानकाची अवस्था भयानक बनली आहे बसस्थानकाच्या रखडलेले काम त्वरीत सुरु करावे यासाठी अनेकदा विभाग नियंत्रक कार्यालयाकडे पत्रव्यवहार यापुर्वी अनेकांनी अनेकवेळा केला आहे, मात्र प्रत्येक वेळी या पत्रांना एस.टी. प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे.

माण तालुक्यात सर्वात मोठे शहर म्हणुन म्हसवडची ओळख आहे, या शहरात सुप्रसिध्द असे हेमाडपंथी श्री. सिध्दनाथाचे भव्य मंदिर आहे, तर तालुक्याची अर्थवाहिनी म्हणुनही या शहराची विषेश ओळख आहे. माण तालुक्यात सर्वात मोठे शहर म्हणुन ज्या म्हसवड शहराला ओळखले जाते, त्या शहराच्या बसस्थानकाकडे पाहिल्यास मात्र बसस्थानक असे तर शहर कसे असा प्रश्न नवीन आलेल्या प्रवाशांना पडल्यावाचुन रहात नाही. वास्तविक म्हसवड शहरातील एस.टी. बसस्थानकाचे नुतनीकरण करणार असल्याचे या विभागाने १२ वर्षापुर्वी सांगत बसस्थानक पाडले तेव्हापासुन सदरचे बसस्थानक हे एखाद्या स्मशानभुमीप्रमाणे भासत आहे.

येथे सध्या प्रवाशांसाठी लागणारी कोणतीही सुविधा नाही तर बसस्थानकात प्रवाशांना थांबण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने बहुतांशी प्रवासी हे स्थानकाबाहेरच एस.टी. ची वाट पहाताना दिसतात. सध्या पाऊसाचे दिवस असल्याने थोडा जरी पाऊस येथे पडल्यास बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे, अशातच याठिकाणी डासांचे मोठे साम्राज्य निर्माण झाले झाल्याने बसस्थानकात एक ही एस.टी. रात्री मुक्कमी न थांबता शहरातील पेट्रोल पंपावर त्या थांबत आहेत. एस.टी. च्या चालक वाहकांना सुध्दा याचा त्रास सहन करावा लागत आहे. तर महिलावर्गाची येथे फार कुचंबना होत असल्याने महिलावर्ग बसस्थानकात येतच नाही अनेक समस्यांच्या विळख्यात हे बसस्थानक सापडले असताना याकडे मात्र सर्वच राजकिय पक्षांचे आजवर दुर्लक्ष झाल्यानेच या बसस्थानकाची अवस्था दैयनिय बनली आहे. सदर बसस्थानकाचे काम त्वरीत सुरु व्हावे याकरीता केवटे यांनी बसस्थानकाबाहेरच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे, तर जोवर सदर बसस्थानकाचे काम सुरु होत नाही तोवर आपण येथुन उठणार नसल्याचा निर्धार केवटे यांनी व्यक्त केला आहे.

ठिय्या आंदोलनाला म्हसवड एस.टी. बसस्थानकाबाहेर केवटे यांनी सुरु केलेल्या ठिय्या आंदोलनाला म्हसवडकरांचा पाठींबा रोज वाढत आहे, केवटे हे दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत याठिकाणी ठिय्या मांडत आहेत, त्यांचे आंदोलन हे म्हसवडकरांच्या दृष्टीने सामाजिक असल्याने त्यांच्यासोबत रोज वेगवेगळे म्हसवडकर नागरीक ठिय्या मांडत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here