Home महाराष्ट्र वणीत २९ ऑगस्ट रोजी विदर्भस्तरीय ‘आजादी की दौड’ स्पर्धेचे आयोजन

वणीत २९ ऑगस्ट रोजी विदर्भस्तरीय ‘आजादी की दौड’ स्पर्धेचे आयोजन

211

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी /
शिक्षण प्रसारक मंडळ, वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय आणि वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित वणी लायन्स इंग्लिश मिडियम हायस्कूल, ज्युनिअर अँड सिनियर कॉलेज, यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विदर्भस्तरीय ‘आजादी की दौड ‘ स्पर्धेचे आयोजन दिनांक २९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ६ वाजून ३०मिनिटांनी केले आहे.
चार किलोमीटर दौड असणारी ही स्पर्धा दोन गटांत होणार आहे.
‘अ’ गटात १२ ते १६ वयोगटातील मुले व मुली असे दोन विभाग आहेत.प्रत्येक विभागात प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये रोख, द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये रोख तर तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये रोख ही पारितोषिके व सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे.
‘ब’ गट १७ वर्षांवरील सर्वांसाठी खुला असून या गटात १७ वर्षांवरील मुले व मुली असे दोन विभाग आहेत.प्रत्येक विभागात प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये रोख, द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये रोख तर तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये रोख ही पारितोषिके व सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे.
सर्व वयोगटातील पहिल्या तीन खेळाडूंना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
आजादी की दौड स्पर्धेत विदर्भातील विद्यार्थ्यांनी व धावपटूंनी सहभागी व्हावे असे आवाहन लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे आणि वणी लायन्स इंग्लिश मिडियम हायस्कूल, ज्युनिअर अँड सिनियर कॉलेजचे प्राचार्य प्रशांत गोडे यांनी केले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरू असून विदर्भातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.केळापूर, मारेगाव, चंद्रपूर, देवरी, पुसद, सावनेर, झरी, वणी,यवतमाळ, नागपूर, वरोरा, अमरावती, गोंदिया येथील धावपटूंनी नोंदणी केली आहे,२७ ऑगस्ट पर्यंत नोंदणी सुरू आहे.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्पर्धेचे संयोजक व लोकमान्य टिळक महाविद्यालयातील शारिरीक शिक्षण तथा क्रीडा विभागाचे संचालक प्रा.उमेश व्यास ,शारिरीक शिक्षक प्रा.कमलेश बावणे, वणी लायन्स हायस्कूल येथील शारीरिक शिक्षक शहजाद हुसैन यांचे सह दोन्ही आयोजन संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अथक परिश्रम करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here