Home गडचिरोली २० आगष्ट रोजी सैनिक समाज पार्टीची बैठक गडचिरोलीत

२० आगष्ट रोजी सैनिक समाज पार्टीची बैठक गडचिरोलीत

89

🔹अनेक राजकीय दिग्गजांचा होणार पक्षप्रवेश

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.9ऑगस्ट):-सैनिक समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विधितज्ञ शिवाजी डमाळे यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आणि राष्ट्रीय अध्यक्ष बलबीर सिंह परमार यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली येथे दिनांक २० आगष्ट २०२३ रोजी सर्वसामान्य जनतेच्या समस्या , अडचणी जाणून घेण्यासाठी आणि त्या समस्यांचे संविधानिक रितसर मार्गाने निवारण व्हावे त्यासाठी शासन दरबारी पाठवुन पाठपुरावा करण्यात येणार आहे तसेच आगामी ग्रामपंचायत नगरपरिषद , नगर पंचायत , विधानसभा, विधान परिषद, लोकसभा निवडणूकीसाठी संभाव्य उमेदवारांची निवड यादी तयार करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

याबरोबरच देशातील महिलांवरील होणारे अन्याय – अत्याचार , शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कारणीभूत घटक ,वाढती बेरोजगारी , वनजमीनीचे पट्टे, जिल्ह्यातील शैक्षणिक तसेच आरोग्य विषयक समस्या, परिवहन , शहरातील आणि दुर्गम भागातील विविध प्रकारच्या समस्या,पेंशन, शासनाने निर्गमित केलेले चुकीचे धोरण ,व्यवसाय आणि बॅकेचे धोरण याबरोबरच विविध प्रकारच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी दिनांक २० आगष्ट २०२३ रोजी दुपारी १२ वाजता गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील विश्राम भवन येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.

तरी सैनिक समाज पार्टीच्या सर्व सभासद, पदाधिकारी आणि कामगार, कंत्राटी कर्मचारी, युवक – युवतींनी आपल्या समस्यांचे लेखी निवेदन घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन सैनिक समाज पार्टीचे महासचिव प्रकाशसिंग बंडवाल , विधानसभा प्रमुख हंसराज उराडे, जिल्हा प्रसिद्धि प्रमुख राहुल वासनिक, अश्विन रोहनकर, विकेश कोहले, पुरुषोत्तम सलामे, राज कोंडागोरलावार, राजबाबु बारसागडे यांनी केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here