✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.19ऑगस्ट):-सार्वजनिक बांधकाम अंतर्गत चोरवड पालम रोडवर डांबरीकरणाचे काम सुरू असताना दि.18 (शुक्रवार) रोजी विद्युत ताराचे स्पर्श झाल्याने शॉर्टसर्किट होऊन क्रेसरने पेट घेतला क्रेसरच्या टायरासहित आग लागली वेळीच क्रेसर मधील कर्मचारी,कामगार यांनी बाहेर पडून आपला स्वतःचा जीव वाचवला दुपारी तीन वाजता लागलेली आग पाहून कामगारांमधील व आजूबाजूच्या नागरीकांनी नगरपरिषद गंगाखेड अंतर्गत असणारी अग्निशामक यांच्या टोल फ्री क्रमांक वर फोन केल्यामुळे काही वेळातच अग्निशामक दलातील प्रमुख रामविलास खंडेलवाल, श्याम जगतकर,श्रीकांत साळवे, अभी साळवे,सुरज खंडेलवाल यांनी लागलीच चोरवड पालम रोड या ठिकाणी जाऊन लागलेली मोठी आग आटोक्यात आणली.
क्रेसर गाडीवर काम करणारे कामगाराना दुखापत झाल्यामुळे पुढील उपचारासाठी गंगाखेडकडे पाठवण्यात आले आहे.गंगाखेड आग्नीशामक दलाने आग आटोक्यात आणल्याने त्यांच्यावर कौतुकाची थाप देण्यात आली यामध्ये नगरपरिषद रामविलास खंडेलवाल,शाम जगतकर,श्रीकांत साळवे,अभी साळवे,सुरज खंडेलवाल यांनी परिश्रम घेतले.