


✒️बल्लारपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
बल्लारपूर(दि.16ऑगस्ट):- बल्लारपूर शहरातील विवेकानंद वार्ड येथील रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर तर्फे विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक येथे दरवर्षी 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आयोजित केले जात असते त्याच प्रमाणे या वर्षी सुध्दा आज दिनांक 15 ऑगस्ट 2023 ला बल्लारपूर शहरातील विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक येथे रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर तर्फे ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या वेळी बल्लारपूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. प्राची राजूरकर मॅडम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या वेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित म्हणून रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर चे संस्थापक व अध्यक्षा सौ. सुमनताई कळसकर व मानवाधिकार साहयाता संघ भारत शाखा बल्लारपूर चे तालुका सचिव तथा बल्लारपूर पोलीस स्टेशन चे पोलीस मित्र रोहन जयंत कळसकर , जेष्ठ वरीष्ठ सल्लागार अशोक मेश्राम, गोंविदा वनकर, हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेड बल्लारपूर चे प्रतिक वाटेकर, संकेत चौधरी, रोहीत चुटे,संदीपदादा सहारे,प्रनय वाटेकर, गणेश मसराम, अंकुश पिपळकर,प्रनिल नवघरे, कपिल कळसकर, यश बांबोळे,स्नेहल बटघरे,धिरज चांदेकर, सुजित पाझारे, मिथुन निमसटकर , देविदास करमरकर महिला मंडळ चे लिला कळसकर, प्राची झामरे,माधुरी जीवतोडे, शाहिन शेख, वनश्री अलोने, रजनी पाझारे, दिपमाला अलोने, करुणा अलोने, व इतर महिला उपस्थित होते,
या कार्यक्रमाचे आयोजन झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर चे अध्यक्ष व मानवाधिकार साहयाता संघ भारत शाखा बल्लारपूर चे तालुका सचिव रोहन जयंत कळसकर , झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर चे मुख्य संयोजक आतिक भैय्या शेख यांनी केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिम आर्मी बल्लारपूर शहर अध्यक्ष शशिकांत निरांजने, कपिल कळसकर, प्रनिल नवघरे, धिरज चांदेकर, सुजित पाझारे यांनी एक दिवस आधी खरी मेहनत हाती घेऊन या कार्यक्रमाला यशस्वी केले आहे.














