


🔸विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार व माजी आमदार डॉ.अविनाश वारजूकर यांची विशेष उपस्थिती
✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.14ऑगस्ट):- चिमूर येथे तालुका काँग्रेस तर्फे भारतीय स्वातंत्र लढ्यात 16 ऑगस्ट 1942 च्या चिमूर क्रांतीचे अमूल्य योगदान आहे. अविस्मरणीय क्रांतीला ८१ वर्षे पूर्ण होत आहेत. चिमूर क्रांती लढ्याचे स्मरण करण्याकरीता चिमूर तालुका कांग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात येणार आहे.
यावेळी महाराष्ट्र विधिमंडळाचे विरोधीपक्ष नेते नामदार विजय वडेट्टीवार व महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा चिमुर विधानसभेचे माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर व अन्य मान्यवर नेते हे चिमूर येथे शहीद स्मृती दिनानिमत्त अभिवादन करण्यासाठी दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी बुधवारला सकाळी ठीक 9 -30 वाजता अभ्यंकर मैदान किल्ल्यावर आणि हुतात्मा स्मारक चिमूर येथे येत आहेत.नागरिकांनी शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. विजय गावंडे यांनी केले आहे.














