Home पर्यावरण मांडवा येथे केले अवघ्या २० मिनिटात ५७० रोपट्याचे रोपण

मांडवा येथे केले अवघ्या २० मिनिटात ५७० रोपट्याचे रोपण

96

🔹श्री सत्यसाई सेवा समिती व मांडवा ग्रा.पं.चा पुढाकार

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.14ऑगस्ट):- श्री सत्यसाई सेवा संघटना महाराष्ट्र पूर्व यांच्या वतीने राज्यस्तरीय दोन दिवशीय श्री सत्यसाई युवा साधना शिबिराचे आयोजन दिनांक १२ ऑगस्ट ते १३ऑगस्ट रोजी वानरे मंगलम् पुसद येथे आयोजित करण्यात आले होते.

या दोन दिवशीय युवा साधना शिबिरामध्ये विविध विषयावर विचारवंताचे मार्गदर्शन युवा विद्यार्थ्यांना मिळाले यामध्ये आध्यात्मिक, सामाजिक ,शैक्षणिक, योग विषयक ,वैद्यकीय कॅम्प, नारायण सेवा, आचार विचार तसेच सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे प्रेमतरू वृक्ष लागवड ही मांडवा ग्रामपंचायत यांच्या लोकसहभागातून ५७० सिताफळ, आवळा, जांभूळ, साग,कडुनिंब, निंबु, आंबा, फणस,अशोका, अशा विविध प्रजातीच्या रोपट्यांचे अवघ्या २० मिनिटात रोपण करण्यात आले.

प्रेमतरु समन्वयक आत्माराम राठोड , श्री. सत्यसाई सेवा समितीचे निमंत्रक डॉ.संदीप चव्हाण, प्रेमतरु समन्वयक अरुण धुमाळे,पवन बोजेवार,बलवंत मोठे,विजय पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला होता.

वृक्षारोपणाच्या नियोजनामध्ये वृक्षप्रेमी कैलास राठोड व रमेश ढोले आणि ग्रा.पं. कर्मचारी प्रदुम्न आबाळे यांच्या सहकार्याबद्दल कौतुक करण्यात आले.

यावेळी गटविकास अधिकारी पं.स.पुसद संजय राठोड,राज्य समन्वयक मनिष समर्थ, राज्य युवा प्रमुख श्रीरंग बुराडे, जिल्हा अध्यक्ष रमेश सातपुते, राज्य समन्वयक युवा महिला अश्विनी मेहरे, सरपंच अल्का ढोले, उपसरपंच विजय राठोड, ग्रामविकास अधिकारी एस.टी. तडसे ,पोलीस पाटील दत्तराव पुलाते, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, सोसायटीचे अध्यक्ष वसंता आडे, कारभारी तुकाराम चव्हाण ,सर्व ग्रा.पं.सदस्य,सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ, गावातील सर्व महिला बचत गट,ग्राम परिवर्तन समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व ग्रा.पं. कर्मचारी, महाराष्ट्र पूर्व मधून ४२६ युवक, युवती आणि महाराष्ट्र राज्यातुन आलेले साईभक्त ,गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here