Home अमरावती पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर

पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर

121

तेरा ऑगस्टला । आज स्मृतिदिनी ।
वंदन करांनी । कोटी कोटी ॥

सुशीला मातोश्री । मानकोजी पिता ।
पेटविल्या वाता । विकासाच्या ॥

मुक्ताबाई लेक । पती खंडेराव ।
पुत्र मालेगाव । परिवार ॥

चौंडी ग्राम नाम । दूर पोहोचले ।
कर्तृत्व गाजले । भारतात ॥

येताच वैधव्य | नाही गेल्या सती ।
जुळविली नाती । जनतेशी ॥

सम्राज्ञी महान । माळवा प्रांताची ।
मल्हाररावांची । क्रांती स्नुषा ॥

अहिल्याबाई ही । एक महाराणी ।
एक राजधानी । महेश्वर ॥

राजधानी मध्ये । जन घडविले ।
नाम थोर केले । होळकर ॥

मानलाच नाही । जाती धर्म भेद
सर्वांनाच छेद । कर्मातून ॥

शेतकरी राजा । झाला पूर्ण सुखी ।
कोणीच ना दुःखी । करमुक्ती ॥

तलाव विहिरी । बांधुनिया दिले ।
आनंदित केले । शेतकरी ॥

न्यायदान देवी । पुण्यश्लोक राणी ।
गाऊ कर्म गाणी । अहिल्येची ॥

दरोडेखोरांना । आश्रय देऊन l
सु-परिवर्तन । घडविले ॥

थोर महाराणी । सम्यक कर्मांत ।
प्रजा आनंदात । जीवनात ॥

जनतेची राणी । थोर तपस्विनी ।
एक तेजस्विनी । अहिल्याच ॥

अहिल्यादेवींच्या । कार्याला नमन ।
करितो वंदन । कोटी कोटी ॥

संत कबीर कविराज
राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त
अभंगकार

✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,रुक्मिणी नगर,अमरावती .भ्र.ध्व. :-८०८७७४८६०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here