स्वातंत्र्याचा दिन उगवला ।
तिरंगा सर्वत्र फडकला ।
कैलासवासी झाले बाबा ॥
याच मंगलमय दिनाला ।
वंदन अमुचे पावन स्मृतीला ॥
ऐतिहासिक पौराणिक महात्म्य जपून असलेल्या अचलपूर नगरीतील नशीबपुऱ्याचे प्रतिनिधित्व नगर परिषदेत करून या पुऱ्याचे नशीबच पालटून टाकणारे माझे वडील कै. बाबारावजी वायलाजी बुंदेले यांचा आज २२वा स्मृतिदिन त्यानिमित्ताने हा लेख प्रप्रंच.नगरसेवक म्हणून १९६० ते १९८० पर्यंत बाबांनी केलेली विकासाची कामे,लोकांना दिलेला जिव्हाळा,प्रेम याला तोड नाही. लोकांच्या कामासाठी सदैव तत्पर राहून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले.
” सामर्थ्य आहे संघर्षाचे ।
जो जो करील तयांचे ।
परंतु तिथे निरहंकाराचे ।
अधिष्ठान पाहिजे ।
याप्रमाणे त्यांचे वर्तन होते.त्यांच्या कार्यातून समाजसेवकांनी प्रेरणा घ्यावी असे त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व होते.जगात स्वतःसाठी जगणारे अनेक असतात मात्र जो स्वतःचा संसार सांभाळून दुसऱ्यासाठी जगतो तोच खरा समाजसेवक असतो.बाबा हे असेच एक व्यक्तिमत्त्व होते.लोकांच्या कल्याणासाठी अर्थात गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेले माझे वडील कै.बाबारावजी बुंदेले यांचा आज २२ वा स्मृतिदिन त्यानिमित्ताने त्यांना प्रथम माझे विनम्र वंदन. त्यांच्या या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या जुन्या स्मृतिंना व कार्याला उजाळा देण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न.जनसेवक,जनताभिमुख, जनकल्याणासाठी झटणारे, निर्गवी,निर्लोभी व्यक्तिमत्त्व म्हणून सर्व परिचित असलेले आदर्श नगरसेवक कै.बाबारावजी वायलाजी बुंदेले यांची भारतीय स्वातंत्र्याच्या ५४ व्या वर्धापन दिनी म्हणजे दि.१५ ऑगस्ट २००१ ला प्राणज्योत विझली .
स्वातंत्र्याचे झेंडे फडकत होते ।
उंच उंच डौलात डोलत होते ।
स्वातंत्र्य दिनी निघून गेले ।
मंगल दिनी स्मृती ठेऊन गेले ।
एक गरिबाचे सेवक,निराधारांचे आधार आपल्यातून निघून गेले तेव्हा सर्वच अचलपूरवासी हळहळले.बाबा नगरसेवक पदावर कार्यरत असताना जी नगरवासीयांना सेवा दिली त्याला तोड नाही.नगरवासीयांची कोणतीही अडचण असो ती ते सोडवण्यासाठी प्रयत्नरत असत.लोकसेवेचा त्यांनी कधीच कंटाळा केला नाही किंवा अहंकारीपण अंगी बाळगले नाही. कारण त्यांना हे माहिती होते की,अहंकार माणसाला प्रथम फुलवितो व नंतर गिळंकृत करतो.समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येकाशी ते प्रेमाने आपुलकिने, जिव्हाळ्याने बोलत व वागत. त्यांची अडचण समजावून घेत व ती सोडविण्याचा प्रयत्न करीत. अचलपूरवाशीयांच्या या गोड स्मृती नेहमीच स्मरणात राहतील.त्यांच्या चांगल्या कार्यातून सर्वसामान्यांना प्रेरणा मिळावी असेच प्रभावी व्यक्तिमत्त्व त्यांचे होते.जगात दोन प्रकारचे लोक असतात.एक म्हणजे स्वतःच्या संसाराचा सांभाळ करणारे आणि दुसरे असे असतात की स्वतःच्या संसारासोबतच इतरांचे ही संसार उद्धवस्त होण्यापासून वाचविणारे व त्यानुसार कार्य सेवा करणारे माझे वडील हे दुसऱ्यांच्या उद्धवस्त होणाऱ्या संसाराला वाचवणारे समाजसेवक होते.
स्वतःसाठी जगता जगता ।
दुसऱ्यासाठी जगून बघावे ।
दुसऱ्यांचे होऊन दाता ।
मनापासून त्यांचे व्हावे ।
असे बाबांचे व्यक्तिमत्त्व होते.स्वतःचे पाच मुलं व तीन मुलींचा योग्य प्रकारे सांभाळ करून स्वतःच्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत व इतर वेळी जी लोकसेवा केली ती फार मोलाची आहे.त्यांच्या या लोकसेवेत त्यांची अर्धांगिनी कै. मैनाबाईचाही खूप मोठा वाटा होता कारण कार्यकर्ता माणूस तेव्हाच कार्य करू शकतो, जनसेवा करू शकतो जेव्हा त्याला त्याच्या अर्धांगिनीची साथ असेल अशाच सेवावृत्तीचे व्यक्तिमत्त्व अर्धांगिनीचे होते.त्यांनी आपल्या संसारी कुटुंबात आपल्या पाल्यांना व नातवांना इंजिनिअर मुख्याध्यापक,प्राध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षक,डॉक्टर होताना बघितले.त्यांचे थोरले चिरंजीव श्री भगवान आज एपीआय पदावरून सेवानिवृत्त झाले.मी धाकटा चिरंजीव प्रा.अरुण श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ,नांदगाव खंडेश्वर, जि.अमरावती येथून पर्यवेक्षक पदावरून सेवानिवृत्त झालो आणि माझ्या आई-वडिलांच्या सामाजिक कार्याचा वरसा माझ्या सामाजिक व शैक्षणिक अशा विविध प्रबोधन मालेतून, भाषणातून,लेखातून,कवितेतून, अभंगातून,विविध विषयावर प्रकाशित केलेल्या विविध विषयावरील अकरा पुस्तकातून पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे.
याचप्रमाणे त्यांचे पाचही मुलं आणि तीन मुली त्यांचे मुलं म्हणजे नातू हे त्यांच्या सेवा कार्यातून आणि विविध प्रकारचे समाजकार्य करून त्यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत.कै.बाबारावजी बुंदेले यांचे थोरले सुपुत्र श्री भगवंतराव हे
A.P.I.पदावरू सेवानिवृत्त झाले असून त्यांची थोरली कन्या
सौ.ज्योती कमलाकर चापके ( नात )ही B.A, M.A. ( Mar ) असून ती आर्वी येथे शिक्षिका आहे . द्वितीय कन्या सौ.दीपाली ओमप्रकाश राखोंडे ( नात )ही B.A.,B.Ed.,.असून M.A. (Soc )मध्ये ती राधाबाई गोयनका कॉलेज,अकोला येथून प्रथम क्रमांकाने मेरीट आली होती.तृतीय कन्या सौ.विद्या राजेंद्र वानरे (नात) ही M.A.(Mar),B Ed.,M Ed.असून नागपूर येथे सहा शिक्षिका आहे.धाकटी कन्या सौ.मेघा सचिनराव सातपुते (नात) ही B. Sc. झालेली आहे.
कै.बाबारावजी बुंदेले यांचे द्वितीय पुत्र कै.रमेशराव यांचा
थोरला पुत्र श्री सचिन (नातू) B.A.,M.B.A.आहे.धाकटा पुत्र
श्री विपिन (नातू) हा B.Sc.कृषी, B.A., M.A.(Soc)असून अमरावतीला वनविभागात कार्यरत आहे.तृतीय पुत्र
श्री गणेशराव यांची थोरली मुलगी सौ.रुपाली प्रवीण किटे (नात) ही B.Sc.,B.Ed.,M.B.A.असून ती हरवाडे कन्स्ट्रक्शन कंपनीत पुण्याला एच.आर.पदावर कार्यरत आहे.धाकटी कन्या सौ. दीपाली मनोजराव नासणे (नात) ही B. Sc., B.Ed.,M.Ed. असून मराठी विषयात Ph.D. (मराठी) सुरु आहे आणि अंजनगाव सूर्जी ( हिरापूर ) येथे शिक्षिका आहे.
धाकटा पुत्र श्री मंगेश(नातू) हा B.E.,M.E.असून पुणे येथील T.C.S.कंपनीत Software Engineer आहे.चतुर्थ पुत्र मी प्रा.अरुण माझा थोरला पुत्र चि.सुमेध (नातू) हा B. E., (VIT, Pune ], M.B.A.( I I M . Kolkutta ) असून तो बंगलोर येथील Black Line कंपनीमध्ये Product Manager पदावर कार्यरत आहे.तरधाकटा पुत्र चि.साकेत (नातू )हा B.E. (MIT, Pune )असून MBA बंगलोर येथील Symbiosis College मध्ये झाले आहे. त्यांचा धाकटा पुत्र श्री मोहनराव यांची कन्या कु.सपना(नात) ही B.B.A.आहे. व चि.स्वप्निल(नातू)आहे.कै.बाबारावजी बुंदेले यांची थोरली कन्या कै. कमलाबाई यशवंतराव शेकोकर M .A ( His ) M.Ed. असून त्या राळेगावच्या क.म.वि.मधून प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या.त्यांचा थोरला पुत्र श्री जयंत (नातू ) B.E.,M.E.असून सी.पी.डब्ल्यू .डी.मध्ये मुंबईला वर्ग १ चा अधिकारी आहे.श्री संजय (नातू ) B.E.,M.B.A. असून पुणे येथील भारत फोर्स कंपनीमध्ये Senior Manager आहे.कन्या सौ.नलिनी अशोकराव जोनवाल ही M.A . ( Soc, Pol. sci ., & Dr.B.R. Ambedkar Thought),B.Ed. असून नागपूरच्या अन्नपूर्णाबाई देशमुख कला व वाणिज्य क.म.वि.मध्ये राज्यशास्त्राची प्राध्यापिका आहे.
त्यांची मधली कन्या कै.शशिकला महादेवराव मांगे हिचे थोरले पुत्र प्रा.रविकिरण (नातू ) M.A(Soc,His), B.Ed.,M.Ed. असून अनसिंग येथील जिजामाता कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे.धाकटा पुत्र श्री विनोद (नातू ) B.A.,D.Ed. असून अचलपूर येथील शहापूर येथे मुख्याध्यापक आहे.धाकटी मुलगी सौ.संजीवनी प्रशांतराव काकडे (नात) ही M.A.,B.Ed., M.Phil. असून Ph.D.करीत आहे.कै.बाबारावजी बुंदेले यांची धाकटी मुलगी सौ.लता प्रभाकरराव इंगळे हिचा थोरला पुत्र श्री राहुल (नातू ) B.E.,M B.A.असून मुंबईच्याJ.S.W. या इंडस्ट्रीजमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत आहे.तर धकटा पुत्र डॉ.शरद ( नातू ) हा M. B. B. S., D. N. B., D.G.O.(.KEN.Mumbai) ,F.R.M.(Fellowship In Reproductive Medicine) ,D.R.M.( Diploma in Reproductive Medicine) हे शिक्षण घेऊन श्री राधे हेल्थ हाईटस या रामदास पेठ ,नागपूर येथील स्वतःच्या दवाखान्यातून स्त्रोरोग, वंध्यत्व (स्त्री -पुरुष ), टेस्ट ट्यूब बेबी इत्यादी सेवा रोग्यांना देत आहे. मुलगी सौ.सारिका नितीन सातपुते (नात) ही B.A., A.T. D.झालेली आहे.त्यांची प्रेरणा घेऊन आज त्यांची मुले व नातू प्राचार्य,प्राध्यापक,पर्यवेक्षक, डॉक्टर,शिक्षक,इंजिनियर,मॅनेजर पदावर आज कार्यरत आहेत व त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा या समाजसेवी कै. बाबारावजी बुंदेले यांच्या आज असलेल्या 22 व्या स्मृतिदिनानिमित्त मी विनम्र आदरांजली अर्पण करतो.
✒️अभंगकार व साहित्यिक:- प्रा .अरुण बाबारावजी बुंदेले,
रुक्मिणी नगर,अमरावती.भ्रमणध्वनी:८०८७७४८६०९