


🔸२ कोटी ४४ लक्ष रुपयांच्या विकास कामांना सुरुवात !
✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मोर्शी(दि.10ऑगस्ट):-आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी विधानसभा मतदार संघाच्या विकासाचे अनेक प्रश्न मांडून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांच्या कडे निधीची मागणी केली. दरम्यान मोर्शी वरुड विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास व कायापालट करण्याचा संकल्प घेऊन आ. देवेंद्र भुयार यांनी आपल्या सुरुवातीच्या काळातच भरगॊस निधी खेचून आणला आहे. या निधि अंतर्गत मोर्शी विधानसभा मतदार संघातील विवीध गावात विकास कामांचा धडाका सुरु असल्याने वरुड मोर्शी तालुक्यातील नागरिकांना विकासाचे पर्व अनुभवास मिळत आहे .
यावेळी मोर्शी तालुक्यातील अंबाडा येथे तलाठी कार्यालय बांधकाम करणे २२ लक्ष रुपये. अभ्यासीका केंद्र बांधकाम करणे १५ लक्ष रुपये. तळस कॉलनी काँक्रीट रस्ता बांधकाम करणे ३० लक्ष रुपये. देविदास सोनारे ते सायवाडा, पिंपरी रोड पर्यंत पांधनरस्ता १ कि.मी. २३ लक्ष रुपये. गुणवंत महाराज टेकडी मलकापुर पांधनरस्ता १ कि.मी. २३ लक्ष रुपये. प्रदिप खोडस्कर ते आंनदराव तडस पांधनरस्ता १ कि.मी. २३ लक्ष रुपये. सागर तडस ते खानापुर पांधनरस्ता १ कि.मी. २३ लक्ष रुपये. ग्रामविकास हायस्कूल व फातीमा उर्दू हायस्कूल येथे वर्ग खोल्या डिजीटल करणे १० लक्ष रुपये. ओकांर पंधरे ते रमेश आहाके काँक्रीट रस्ता करणे ५ लक्ष रुपये. मोहन परतेती ते ज्ञानेश्वर उईके काँक्रीट रस्ता बांधकाम करणे ५ लक्ष रुपये.
११) पिण्याच्या पाण्याच्या सोईकरीता पाइपलाईन १० लक्ष रुपये. बुध्दविहार समोरील नाल्यावर व बसस्टॉप येथे काँक्रीटीकरण करणे ३.५० लक्ष रुपये. बसस्टॉप ते बुध्दविहार नाली बांधकाम करणे ३.५० लक्ष रुपये. वार्ड क्र. ५ मध्ये काँक्रीट रस्ता बांधकाम करणे ३ लक्ष रुपये. सत्तार शहा यांच्या घरापासुन पतसंस्था काँक्रीट नाली बांधकाम करणे १० लक्ष रुपये. प्रकाश परीहार ते सलाम कुरेशी काँक्रीट रस्ता बांधकाम करणे १० लक्ष रुपये. प्रमोद ठाकरे ते राजु कोकाटे काँक्रीट नाली बांधकाम करणे ५ लक्ष रुपये. श्री संत गुणवंत महाराज टेकडी येथे वाहनतळ व पेव्हींगब्लॉक बसवणे व वॉलकम्पाउंट २० लक्ष रुपये यासह विविध कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
आमदार देवेंद्र भुयार यांनी विविध योजने अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यामुळे अंबाडा येथील विकास कामांना प्रारंभ झाला असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अंबाडा गावांमध्ये विविध विकास कामे सुरू झाली असून या विकास कामांना आमदार देवेंद्र भुयार यांनी प्राधान्य दिले आहे.
यावेळी भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याला आमदार देवेंद्र भुयार, सरपंच रुपाली कडू, नरेंद्र जिचकार विपुल हिवसे, माजी जीप सदस्य बंडू साउत, अमोल कडू अज्जू भाऊ सौदागर शंकरराव नरे केशवराव गिरारे प्रकाश आजनकर रामकृष्ण उईके अमित देशमुख गौरव गिरी मुरली मुरली आढाऊ लोकेश राऊत सुनील लुंगे दर्शन म्हाला सुधाकरराव महाले विवेक शहाणे धनराज राठोड अशोकराव खातदेव ग्राम पंचायत सदस्य यांच्यासह अंबाडा येथील हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














