


✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.5ऑगस्ट):-ऑल इंडिया पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक केदार यांच्या वाढदिवसानिमित्त दि.5 ऑगस्ट (शनिवार) रोजी ऑल इंडिया पँथर सेनेचे गंगाखेड तालुकाध्यक्ष विकास रोडे यांच्या वतीने येथील उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळांचे व बिस्कीटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास पॅंथर सेनेचे पालम तालुका उपाध्यक्ष अनिल मस्के व रुग्णालयातील कर्मचारी राठोड, लटपटे यांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश साळवे, गुणवंत टोमके, गजानन सगट, सत्यम साळव,विजय हनवते, सुनील मस्के, मुंजा साबणे, बाळासाहेब व्हावळे, नितीन व्हावळे, सुरज लामतुरे आदि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले














