✒️प्रतिनिधी कोरची(वसीम शेख)
कोरची(दि.3ऑगस्ट):- तालुक्यातील ओबीसी, एससी, एसटी व इतर समाजाच्या वतीने संभाजी भिडे यांना तातडीने अटक करण्यात यावी यासाठी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
संभाजी भिडे अर्थात मनोहर कुलकर्णी यांनी महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्या विरोधात अभद्र वक्तव्य करीत अपमान केला आहे.
समाजा समाजात वाद घालण्यासाठी वक्तव्य करीत आहे. ज्या महापुरुषांनी समता आणि मानवतावादी विचार पेरून समतामुलक समाज तयार करण्यासाठी अख्ख्या आयुष्य खर्ची घातले आहे,अशा महापुरुषांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या मनोहर कुलकर्णी अर्थात संभाजी भिडे यांना तातडीने अटक करून त्यांचेवर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली.
निवेदन सादर करताना राकेश मोहुर्ले, अजीत मोहुर्ले, रोशन शेंडे, मनोज अग्रवाल, वसीम शेख, राजू टेंभुर्णे, चेतन कराडे, आनंद पंधरे, अविनाश हुमणे, मोसिय जाळीया, चंदू वालदे, पंजाबराव उईके, रामदास कल्लो, विजय गुरनुले, विजय चौधरी ईत्यादी लोक उपस्थित होते.