🔸छत्रपती शिवरायांचा अनमोल ग्रंथ व शाल देऊन सुमित पाटील यांचा सत्कार !….
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)
धरणगांव(दि.31जुलै):- शहरातील कृष्ण गीता नगरवासीयांनी नगर परिषदेचे आभार मानले. सविस्तर वृत्त असे की गेल्या अनेक वर्षापासून कृष्ण गीता नगरची रस्त्याची अवस्था अतिशय खराब होती. यावर्षी नगरपरिषदेने रस्त्यावर मुरूम टाकून समस्या दूर केली व रस्ता सुरळीत केल्याबद्दल कृष्ण गीता नगरवासीयांनी नगर परिषदेचे अभियंता सुमित पाटील यांचा छत्रपती शिवरायांचा अनमोल ग्रंथ व शाल देऊन यथोचित सन्मान केला. आमच्या कृष्णा गीता नगर कॉलनीवर असेच सहकार्य व प्रेम असू द्यावे असे प्रतिपादन पी डी पाटील यांनी केले.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारीसो.जनार्धन पवार, तहसीलदारसो. महेंद्र सूर्यवंशी, गटनेते पप्पु भावे यांच्या मार्गदर्शनाने व कार्यालयीन अधिक्षक संजय मिसर, अभियंता सुमित प्रभाकर पाटील टॅक्स अधिकारी प्रणव संजय पाटील यांच्या सहकार्याने रस्त्याचे समस्या दूर झाली. याप्रसंगी दिपक वाघमारे, अनिल पाटील, राजेंद्र माळी, शिरीष पाटील, भगवान माळी, संजय शुक्ल, सुरेश चौधरी, सिकंदर पवार यांचे सहकार्य लाभले.
कृष्णा गीता नगर कॉलनीचे अध्यक्ष बी.एम.सैंदाणे, उपाध्यक्ष विनायक न्हावी , सचिव महेंद्र सैनी, प्रल्हाद विसपुते, जे.एस. पवार, एस.एन.कोळी, निलेश कुलट, बाळु अत्तरदे, पंकज मिस्तरी,गोकुळ महाजन, संजय सुतार, ज्ञानेश्वर पवार, भरत पाटील, पी.डी.पाटील सर्व कॉलनिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.