🔸शासकीय इतमामात अंत्यसंस्कार संपन्न
✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466
महागाव(दि. 31जुलै):-स्थानिक लक्ष्मीनगर, बोरगडी येथील रहिवासी व पूर्वी शिवाजी वार्ड येथे वास्तव्यात रहिवासी होते.ते काल दि. 30 जुलै 2023 रोजी कर्तव्यावर असताना त्यांना काल मध्यरात्री कोसदनी घाटात नागपूर तुळजापूर महामार्ग येथील भीषण अपघातात त्यांना वीरमरण आले.
त्यांना पोलीस प्रशासनाकडून, उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस चमुने बंदुकीच्या फैरी हवेत झाडून सलामी व मानवंदना देण्यात आली.यावेळी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी,पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.सलामी इनचार्ज संतोष वेटी यांच्याकडून मानवंदने सह सलामी देण्यात आली.
संजय नेटके हे एक सू स्वभावी मन मिळायू व्यक्तिमत्व होते त्यांनी त्यांच्या हालाखीच्या परिस्थितीतून होमगार्ड या पदापासून रुजू होण्याचा मान मिळवला त्यांच्या पश्चात, त्यांची आई कोंडाबाई, भाऊ रमेशराव नेटके, गणेश नेटके, विनोद नेटके त्यांची पत्नी शारदा नेटके, मुलगी गायत्री, मुलगा निर्भय असा बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांना बोरगडी ग्रामपंचायत चे माजी सरपंच, तथा होमगार्ड माजी तालुका समादेशक, विश्वास भवरे यांनी सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी सूत्रसंचालन मानव सेवा समितीचे, ललित सेता यांनी केले.यावेळी पुसद शहरातील गणमान्य व्यक्ती मित्रपरिवार तसेच मोठा जनसमुदाय या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित होता.