Home महाराष्ट्र उमरखेड तालुक्यातील डोंगरगाव धरणाच्या काठावर आढळली मानवी कवटी

उमरखेड तालुक्यातील डोंगरगाव धरणाच्या काठावर आढळली मानवी कवटी

115

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 31जुलै):-तालुक्यातील पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले डोंगरगाव येथील धरणाच्या काठावर मानवी कवटी कुजलेल्या अवस्थेत 28 जुलै संध्याकाळच्या सुमारास आढळल्याने खळबळ उडाली आहे.

डोंगरगाव येथील धरणाच्या काठावर मानवी कवटी असल्याची माहिती डोंगरगाव येथील पोलीस पाटील अजय मस्के यांनी पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजीव हाके यांना भ्रमणध्वनीद्वारे सांगितले असता.त्याच क्षणी पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी करून महागाव पोलीस स्टेशनची 112 क्रमांकाची गाडी बोलावून डोंगरगाव धरण काठावरील एक मानवी कवटी ही पुरुष जातीची किंवा स्त्री जातीची आहे.

त्याबद्दल माहीत नसून कवटीचा पंचनामा करून ताब्यात घेऊन सदर प्रकरणात पोफळी पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली.असून पुढील तपास ठाणेदार राजीव हाके करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here