✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
बिटरगाव (दि. 29 जुलै) बिटरगाव पोलीस स्टेशन परिसरातुन अवैधरित्या चालणाऱ्या रेती वाहतूक दराला मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.
सविस्तर बातमी अशी आहे की, गुप्त बातमीदारा कडून मिळालेल्या माहितीवरून विकास भिकू आडे, वय 25 वर्ष, रा.भिकूनगर, फुलसावंगी ता.महागाव हा टाकळी (इ) येथील नाल्यात अवैध्यरित्या रेती वाहतूक करताना मिळून आला.
त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर ज्याचा नं. एम एच 29/बि.सी./1475 त्याला जोडून असलेली लाल रंगाची ट्राली 4,50,000/-रु व एक ट्राली भरून रेती कि 6000/-रु. असा एकूण 4,56,000/-रु चा मुद्देमाल मिळून आल्याने पो.स्टे.बिटरगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक- पवन बन्सोड सा, मा.अप्पर पोलीस अधीक्षक-पियुष जगताप सा, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी- प्रदीप पाडवी सा यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही ठाणेदार सुजाता बन्सोड सोबत पो.उप.नि शिवाजी टिपूर्णे, NPC गजानन खरात, NPC मोहन चाटे, पो. काँ. दत्ता कुसराम, पो. काँ. निलेश भालेराव, पो. काँ. प्रवीण जाधव पो. स्टे.बिटरगाव नी केली.