Home पर्यावरण जागतिक व्याघ्र दिवसा निमित्ताने जनजागृती बाईक रॅली-कुही वन्यजीव वनपरीक्षेत्राचा उपक्रम

जागतिक व्याघ्र दिवसा निमित्ताने जनजागृती बाईक रॅली-कुही वन्यजीव वनपरीक्षेत्राचा उपक्रम

110

✒️कुही(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कुही(दि.29जुलै):-कुही वन्यजीव वनपरीक्षेत्र अंतर्गत वनपरीक्षेत्र अधिकारी यांचे नियंत्रणाखाली क्षेत्रीय कर्मचारी, ईडीसी सदस्य, पर्यटक मार्गदर्शक यांचे सहकार्याने गोठणगाव पर्यटन ते धरमखिंड कुटी पर्यत बाईक रैली काढण्यात आली.

रैली दरम्यान गोठाणगाव, रेंगातूर, दहेगाव, वेळगाव, ठाणा, डोंगरमौदा, धामना, चिकना गावातून बाईक रैली काढून वाघ वन्यप्राणी अधिवास, मानव वन्यजीव संघर्ष तसेच अन्नसाखळी तील वाघाचे महत्व याबाबत जनजागृती करण्यात आली.

त्यांनतर व्याघ्र दिनाचे अवचित्य साधून रानबोडी संरक्षण कुटीवर वेगवेगळ्या प्रजातीचे 150 रोपटी लावून वृक्षारोपण करण्यात आले व कर्मचारी यांना वन्यप्राणी यांचे संरक्षण वं संवर्धनाचे मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी वनपरीक्षेत्र अधिकारी कुही वन्यजीवं आरती ठाकरे मॅडम, वनपाल मारोती दबे, वनरक्षक गौतम कांबळे,वनरक्षक सागर चावट,वनरक्षक किशोर चव्हाण, वनरक्षक समाधान केंद्रे, वनरक्षक हनुमंत शिंदे,वनरक्षक महेश कुथे, वनरक्षक कराड, वनरक्षक विद्या भुसारी, वनरक्षक मनीषा धोके वनरक्षक वर्षा शेंडे, महेश पडोळे इडीसी अध्यक्ष व सदस्य पर्यटक मार्गदर्शक व गावकरी उपस्थित हॊते.

*वनपरीक्षेत्र अधिकारी*
*कुही वन्यजीव*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here