Home महाराष्ट्र चोपडा महाविद्यालयात अभिरूप युवा संसद कार्यशाळेचे आयोजन

चोपडा महाविद्यालयात अभिरूप युवा संसद कार्यशाळेचे आयोजन

103

✒️चोपडा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

चोपडा(दि.29जुलै):- येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा व युवक बिरादरी भारत, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा नेतृत्व विकास, युवाभूषण व अभिरूप युवा संसद’ या विषयावर दि. २७ व २८ जुलै या दरम्यान ‘दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे’ आयोजन स्मार्ट हॉल येथे करण्यात आले.

या दोन दिवसीय कार्यशाळेचे उदघाटन महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील, कार्यशाळेचे प्रशिक्षक व युवक बिरादरीचे संचालक सचिन वाकुळकर तसेच युवक बिरादरीचे नीती कौन्सिल सदस्य डॉ. नागेंद्र रॉय, बिरादरीचे इतर सदस्य व प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. यावेळी सौ. भारती सूर्यवंशी, मुख्याध्यापक एन. एस. सोनवणे, मुख्याध्यापक एच. बी. मोरे, प्राचार्य सौ. ममता न्याती, समन्वयक आर. डी. साठे व इतर मान्यवर उपस्थित होते.
 

या उदघाटन समारंभाचे प्रास्ताविक एन. एस. सोनवणे यांनी केले तर प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांनी उदघाटनपर मनोगत व्यक्त करतांना कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, युवकांच्या शैक्षणिक विकासा सोबतच नेतृत्व विकास, कर्तृत्व विकास व दायित्व विकास होणे आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रस्तुत कार्यशाळा महत्त्वपूर्ण असल्याचे स्पष्ट केले. या कार्यशाळेच्या उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जे. एस. पाटील यांनी केले.

   या दोन दिवसीय कार्यशाळेत एकूण ७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी करून सक्रिय सहभाग घेतला होता. अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित करणारे जळगांव जिल्ह्यातील चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय हे पहिले महाविद्यालय ठरले आहे. या कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी प्रशिक्षक सचिन वाकुळकर यांनी युवक बिरादरी (भारत), मुंबई या संस्थेची माहिती देतांनाच या संस्थेकडून विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांविषयी माहिती दिली. तसेच ‘युवा नेतृत्व विकास, युवाभूषण व अभिरूप युवा संसद’ या विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी दि. २८ जुलै रोजी डॉ. नागेंद्र रॉय यांनी अभिरूप युवा संसद स्पर्धेची संपूर्ण माहिती दिली. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकद्वारे युवा संसद स्पर्धेची तयारी कशी केली पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केले.या कार्यशाळेच्या समारोप समारंभाप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी संस्था व महाविद्यालय नेहमी तत्पर असल्याचे मत व्यक्त केले.

या कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. एस. सोनवणे यांनी केले तर सुत्रसंचालन एस. आर. सोनवणे यांनी आभार व्यक्त केले.या कार्यशाळेच्या आयोजनासाठी डॉ. डी. डी. कर्दपवार, डॉ. बी. एम. सपकाळ, डॉ. पी. के. लभाने, डॉ. एच. जी. चौधरी, सौ. एस. बी. पाटील, किशोर खंडाळे, एस. जी. पाटील व बी. एच. देवरे यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here