Home महाराष्ट्र चिमुर शहरात मुत्रीघरे गायब, नागरिकांची गोची !

चिमुर शहरात मुत्रीघरे गायब, नागरिकांची गोची !

208

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.24जुलै): महाराष्ट्राचा विकास झपाटयाने झाला पाहीजे असे सांगुन राजकारणी लोक पक्षामध्ये तडजोड करून सत्ता स्थापित करीत आहेत. मात्र नागरिकांच्या मुलभुत गरजांकडे गंभीरतेने लक्ष देण्यात येत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. तालुका असलेले व मोठी लोकसंख्या असलेल्या चिमुर शहरात साधी मुत्रीघरे नसणे शोकांतीका असल्याचे शहरवासी बोलत आहेत, काही वर्षांपूर्वी चिमुर शहरात ठिकठिकाणी जी सार्वजनिक मुत्रीघरे अस्तित्वात होती ती मुत्रीघरे सध्यास्थितीत गायब झाली असुन त्यांचा ठावठिकाणा नाही. परिणामी, तालुक्याची प्रतिष्ठा असलेल्या या शहरात खेडेभागातुन येणाऱ्या नागरिकांना मुत्रीघरां अभावी मोठी समस्या निर्माण झाली आहे.

चिमुर शहरात बाजारपेठेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचप्रकारे शहरात आवागमन करणाऱ्यांची संख्याही मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. सर्व रस्ते गजबजलेल्या अवस्थेत दिसत आहेत. अशा परिस्थितीत चिमुर-कांपा मुख्य रस्त्यावर फक्त नेहरू विद्यालयाचे बाजुला मुत्रीघर असले तरी तिथे सुध्दा बाजुला चिकन सेंटरची दुकान असल्यामुळे त्या मुत्रीघरात महिला जाण्याचे टाळतात. त्यामुळे मुत्रीघरे नसल्यामुळे पुरुष तथा महिला वर्गाचीही मोठी पंचायत झाल्याचे पहावयास मिळत आहे.

चिमुर क्रांतीभुमीचा विकास साधायचा असल्याचे काही राजकारणी बोलत असले तरी नागरिकांच्या मुलभुत सुविधेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे बोलल्या जात आहे. आगामी काळात नगर परिषदच्या निवडणुका होवु घातल्या असतांना आता नव्याने राजकारणात प्रवेश करणाच्या कार्यकर्त्यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष दिले तर त्याचा फायदा त्यांना निश्चितच होईल.

चिमुर शहरात सार्वजनिक मुत्रीघरे नसल्यामुळे ये-जा करणाऱ्या पुरुष व महिलांची समस्या गेल्या अनेक दिवसांपासून कायम आहे. मात्र नगर परिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी या समस्येकडे गंभीरतेने लक्ष देवुन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here