Home महाराष्ट्र सामाजिक, साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रज्ञावंतांचा होणार गौरव

सामाजिक, साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रज्ञावंतांचा होणार गौरव

130

✒️अहमदनगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अहमदनगर(दि.24जुलै):-शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतीक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रज्ञावंतांचा गौरव करण्यात येणार असून नवोदितांना पुस्तके प्रकाशित करण्यासाठी स्वतंत्र वेळ ठेवण्यात येणार आहे* असल्याची माहिती शब्दगंध साहित्यिक परिषदेचे खजिनदार भगवान राऊत व प्रसिध्दी प्रमुख राजेंद्र फंड यांनी दिली.

शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी, प्राचार्य जी.पी. ढाकणे,मार्गदर्शक ज्ञानदेव पांडुळे, प्रा.डॉ.शंकर चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.ज्या नवोदित साहित्यिकांना आपली पुस्तके प्रकाशित करावयाची असतील त्यांनी तात्काळ पुस्तकाच्या दोन प्रती पाठवाव्यात.

या संमेलनात परिवर्तन रॅली, उद्घाटन, परिसंवाद, चर्चासत्र,दोन काव्य संमेलन, कथाकथन, पुस्तकं प्रकाशन, प्रदर्शन,जीवन गौरव पुरस्कार व वाड:मय पुरस्कार वितरण,सांस्कृतिक कार्यक्रम, समारोप असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात येणाऱ आहे. या बैठकीत संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष, विविध समित्या,निधी संकलन या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

सप्टेंबर 2023 च्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या साहित्य संमेलनात प्रज्ञावंतांचा गौरव होणार असून यासाठी प्रज्ञावंतांनी आपली सविस्तर माहिती, परिचय,फोटो दिनांक 10 ऑगस्ट 2023 पूर्वी शब्दगंध साहित्यिक परिषद, फुलोरा,लक्ष्मी कॉलनी, भिस्तबाग महाला जवळ, तपोवन रोड, सावेडी अहमदनगर ४१४००३ येथे पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सप्टेंबर मध्ये होणाऱ्या संमेलनात प्रज्ञावंतांना शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे हस्ते गौरवण्यात येणार आहे.

या बैठकीस सामजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, राजेंद्र चोभे, बबनराव गिरी, कवयित्री सरोज अल्हाट, शर्मिला गोसावी,किशोर डोंगरे ,राजेंद्र पवार, संतोष कानडे, सुभाष सोनवणे, प्रा.डॉ.पालवे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here