


✒️अहमदनगर(पुरोगामी न्युज नेटवर्क)
अहमदनगर(दि.21जुलै):-शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य ची महत्वपूर्ण बैठक रविवार दिनांक २३/०७/२०२३ रोजी दुपारी ५ वा.अहमदनगर येथील कोहिनूर मंगल कार्यालयात अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे,* अशी माहिती शब्दगंध चे कार्यवाह सुभाष सोनवणे व प्रसिध्दी प्रमुख राजेंद्र फंड यांनी दिली.
ज्येष्ठ मार्गदर्शक ज्ञानदेव पांडूळे, प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे,संस्थापक सुनील गोसावी, भगवान राऊत यांच्या सह सर्व सभासदांच्या उपस्थिती मध्ये होणाऱ्या या बैठकीत पंधरावे राज्यस्तरीय साहित्य संमेलन तारीख निश्चित करणे, उद्घाटक, संमेलनाध्यक्ष निवड करणे, प्रमूख पाहुणे, काव्यसंमेलन अध्यक्ष निवडणे, शब्दगंध जीवनगौरव पुरस्कार नावें निश्चित करणे, विविध समित्या मध्ये नावे निश्चित करणे, निधी संकलन करणे,संमेलन नियोजन/स्वागत समिती निश्चित करणे. यासह इतर महत्वपूर्ण विषयावर निर्णय घेण्यात येणार आहेत.
तरी साहित्यिक व साहित्य रसिकांनी या बैठकीस उपस्थित राहून पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे नियोजन करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र उदागे, प्रा.डॉ.अशोक कानडे, संस्थापक सुनील गोसावी ,अजयकुमार पवार, शाहिर भारत गाडेकर, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, प्रा. डॉ. तुकाराम गोंदकर, सुनीलकुमार धस,शर्मिला गोसावी, किशोर डोंगरे,रामकिसन माने, बबनराव गिरी,स्वाती ठुबे, राजेंद्र पवार यांनी केले आहे.













