🔸मातंग समाजाचा टाक वाटा ,नाहीतर करेल तुझा घाटा – भागवत कांबळे
✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)
जिवती(दि.20जुलै):- महाराष्ट्रात मातंग समाज हा मोठ्या प्रमाणात आहे मात्र आरक्षणाचा विचार करता तो अती मागास आहे.आरक्षणाचा लाभ काही जातींना मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यासाठी अनुसूचित जाती चे अबकड असे वर्गीकरण करावे.त्यावेळी आझाद मैदान मुंबई येथे दवंडी मोर्चा मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.ज्यामुळे सर्व स्तरातील जातींना याचा लाभ होईल.तसेच साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन संस्था(आर्टी) ची स्थापना करावी. क्रांतीवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाची अमलबजावणी करावी,शहीद संजयभाऊ ताकतोडे याच्या कुटुंबाचे शासकीय मदत देऊन पुनर्वसन करावे.
अशा विविध मागण्या घेऊन महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मांग,मातंग बांधव मुबई येथे मंत्रालयावर दवंडी मोर्चा काढला.कारण बार्टी मध्ये मातंग समाजावर अन्याय होत आहे.त्यामुळे आम्हाला वेगळी आर्टी ची गरज असल्याचे यावेळी भागवत कांबळे यांनी सांगितले.तर तेलंगणा राज्य जर अबकड वर्गीकरण करू शकते तर महाराष्ट्र राज्य हे का करू शकत नाही असे सामाजिक कार्यकर्ते विष्णू कसबे यांनी म्हटले.यावेळी महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.