✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
चोपडा(दि.18जुलै):- लासूर येथे संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडली.माळी समाज मंगल कार्यालय येथे गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी व समाज बांधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच पुण्यतिथी निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते व भक्तिमय वातावरणात संत शिरोमणी सावता महाराज यांची आरती करून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणुकीत गावातील समाज बांधव व महिला मंडळाची उपस्थिती लक्षनीय होती.
तसेच श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी निमित्त क्षत्रिय माळी समाज विकास मंडळ व श्री संत सावता महाराज ग्रामीण बिगरशेती पतसंस्था लासूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्मशानभूमी परिसर व माळी समाज मंगल कार्यालयाच्या नवीन जागेत वृक्षारोपण करण्यात आले.
त्याप्रसंगी क्षत्रिय माळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष ए के गंभीर सर, उपाध्यक्ष रामकृष्ण माळी, सचिव सुरेश पवार, सहसचिव अरुण माळी, श्री संत सावता महाराज ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे चेअरमन आर एन पवार सर, व्हा. चेअरमन जितेंद्र महाजन, वि का सह सो चेअरमन सुरेश माळी, पीक संरक्षण सो सा चेअरमन गोकुळ माळी, पतसंस्थेचे माजी चेअरमन गोविंद माळी, संचालक शंकर माळी, हिंमत माळी सर,कैलास महाजन सर, प्रवीण मगरे, जेष्ठ समाज बांधव हिंमतराव महाजन, रतिलाल माळी, तुकाराम माळी, क्षत्रिय माळी समाज विकास मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र महाजन, भास्कर माळी, रमेश माळी, साखरलाल माळी, देविदास मगरे, जिभाऊ टेलर्स,जगन्नाथ महाजन आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्षत्रिय माळी समाज विकास मंडळाचे संचालक मास्टर टेलर्स, प्रमोद मगरे,पीक संरक्षण सो सा माजी व्हा चेअरमन किशोर माळी सर, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश महाजन, वासुदेव महाजन, दिपक महाजन,शामकांत माळी, प्रेमराज शेलकर,विनोद महाजन सर, नितीन माळी, निलेश राजकुळे, राजेश माळी, पप्पू माळी आदी समाज बांधव यांनी परिश्रम घेतले.