✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.18जुलै):-दिनांक 17 जुलै 2023 रोज सोमवारी डोंगरी जन परिषदेच्या वतीने डोंगर भागातील शेतकऱ्यांचे आपल्या विविध मागण्यांसाठी गंगाखेड तहसील कार्यासमोर भव्य असे धरणे आंदोलन करून तहसीलदार यांच्या मार्फत माननीय जिल्हाधिकारी महोदयांना खालील मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 2022 च्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतिवृष्टी व सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे अनुदान मंजूर झाले आहे ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर पंधरा दिवसात वाटप करण्यात यावे गंगाखेड तालुक्यामध्ये 60 ते 70 टक्के डोंगर भाग असून गेल्या पाच वर्षापासून डोंगरी भागामध्ये हरण रानडुकरे रोही सायाळ मोर आदी वन्य प्राण्यांची प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे त्या वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा व वन्य प्राण्याकडून झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी.
वनपरिक्षेत्रे कार्यालयाने वन्यप्राण्याने केलेल्या शेती पिकाच्या नुकसान भरपाईची तक्रार करण्याची वेबसाईट गेल्या वर्षापासून जाणून बुजून बंद केली आहे ती वेबसाईट चालू करण्यात यावी तसेच डोंगर भागातील माकणी पिंपळदरी राणीसावरगाव महसूल मंडळात बसवलेल्या पर्जन्यमापक यंत्राच्या परिसरातील दर आठवड्याला गवत झाडे झुडपे वाढून देता त्यांची साफसफाई करण्यात यावी या मागण्यासाठी आज 17 जुलै 2023 सोमवार रोजी डोंगर भागातील शेकडोच्या संख्येने शेतकऱ्यांनी डोंगरी जन परिषदेच्या वतीने धरणे आंदोलन करून मा तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले तहसीलदार यांना निवेदन देतेवेळी गंगाखेड नगरीचे माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे वनपरिक्षेत्र विभागाच्या वनरक्षक भेंडेकर मॅडम नायब तहसीलदार श्री कांबळे साहेब उपस्थित होते.
या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व शेतकऱ्यांसोबत वरील मागण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करून माननीय तहसीलदार महोदयांनी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या सोडवण्याचे आश्वासन दिले निवेदनावर डोंगरी जनपरिषदेचे मुख्य संयोजक पंडितराव घरजाळे संयोजक आश्रोबा दतराव सोडगीर पंडित निवृत्ती सोडगीर केशव भेंडेकर दादासाहेब खांडेकर बालासाहेब बारगिरे बालासाहेब प्रभाकर सोडगीर दगडोबा पवार लक्ष्मण पवार राजेभाऊ खोडवे बळीराम मुंडे भास्कर सांगळे शंकर अण्णा रुपनर बालासाहेब रंगनाथ सोडगीर सिताराम देवकते दशरथ मोठे गोपीनाथ भोसले नागनाथ गरड विजयकुमार गरड राम कृष्ण मुंडे अर्जुन जायभाय गोपीनाथ मुंडे भरत सोडगीर रतन सिंग सिसोदे यशवंत कातकडे नारायण सोडगीर बळीराम कस्तुरे गणेश तात्या सिसोदे बालासाहेब मुंडे वैजनाथ मुंडे जानकीराम बारगिरि मंगेश मुंडे दत्ता दराडे ज्ञानोबा फड महारुद्र खांडेकर विनायक दहिफळे श्रीरंग तिडके मुंजाजी तिडके वैजनाथ सलगर विनायक मुरकुटे रामप्रभू बारगिरी सूर्यकांत मुंडे अंकुश मुसळे अंगद बडे भगवान सिसोदे प्रल्हाद खांडेकर गोरख देवकते बालाजी पवार विठ्ठल इमडे पंडित पागे बळीराम सूर्यवंशी मनोहर वाकडे बालाजी मुंडे शिव प्रसाद मुंडे महादेव मुंडे दत्ता गाडे ज्ञानोबा केंद्रे संभाजी मुंडे नागनाथ मुंडे पांडुरंगात कातकडे मनोहर भंडारे अभिमान सांगळे उमेश मुंडे भागवत मुंडे बाळू घरजाळे माऊली मुंडे तुकाराम मुंडे माणिक मुंडे दिनकर मुंडे गोविंद कातकडे रामकिशन मुंडे अंगद देवकते शंकर तरडे वैजनाथ चव्हाण ज्ञानेश्वर मुंडे सोपान बडे अंतराम ठूले अच्युत बडे अप्पाराव रुपनर आदी डोंगर भागासह संपूर्ण तालुक्यातील असंख्य शेतकरी या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.