✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड (दि. 16 जुलै):-शहरातील बुद्ध विहारामध्ये नवीन आणलेल्या एंपलीफायर चे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते दानशूर आदरणीय सुधाकरराव लोमटे व कल्पनाताई सुधाकर लोमटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी लोमटे परिवारातील सर्वच सदस्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सुधाकर लोमटे आणि कल्पनाताई लोमटे यांच्या मंगल परिणय दिनानिमित्त विहाराच्या विकास कामाकरिता 15 हजार रुपये दिले होते.
या 15 हजार रुपयामध्ये विहारासाठी नवीन एम्पलीफायर 17200 रुपये चा आणण्यात आला.
2200 रुपये ची कमतरता भासल्याने हिराबाई दिवेकर, जिजाबाई दिवेकर, यशोदाबाई दिवेकर, यशोधराबाई धबाले जाणताबाई इंगोले, उषाताई इंगोले, नंदाबाई लोखंडे, संजय दिवेकर, तुषार पाईकराव, सिध्दार्थ दिवेकर, प्रफुल दिवेकर इत्यादींनी कमी पडलेली रक्कम जमा केली.
यावेळी उद्घाटक सुधाकरराव लोमटे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद बरडे सर हे होते.या दोघांनीही आपले मनोगत व्यक्त करून समाजाला जागृत करण्याचे काम केले.आणि समाजाला आवश्यक असलेल्या गोष्टीला सहकार्य करत राहू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार सिद्धार्थ दिवेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल दिवेकर, तुषार पाईकराव (सामजिक कार्यकर्ते) यांनी केले होते.
यावेळी भंते कीर्ती बोधी,भालचंद्र लोमटे, इंदुबाई लोमटे,संकल्प लोमटे,सोनुले भाऊ,हिराबाई दिवेकर (माजी नगरसेविका), जिजाबाई दिवेकर, यशोदाबाई दिवेकर, सुब्द्राबाई पाईकराव, यशोधरा धबाले, जाणकाबाई इंगोले, उषाताई इंगोले, नंदाबाई लोखंडे, आकाश श्रवले, तनेज पाईकराव असे अनेक उपासक उपसिका तसेच तरुण मंडळी, बालक तथा बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.