संविधान आणि मनूस्मृती हा माणसाच्या व्ययक्तिक जिवनाचा संघर्ष. यामधील फरक आजतागायत सर्वांनाच कळतो तरी सुद्धा एका वाक्यात सांगायचे झाले तर संविधान म्हणजे घेणारा मोकळा श्वास ….व मनुस्मृती म्हणजे बहिष्कृत जगणं….
आपण ज्या देशात वास्तव्यास आहोत तो देश लोकशाही मार्गाने चालणारा. जगण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणारे संविधान मानवी अधिकार व हक्कांसाठी च नाही तर पशू पक्ष्यांच्या संवेदना जपण्यासाठी सुध्दा आहे.परंतु आजची परिस्थिती पाहता अगदीच विपरीत आहे.भारत देशाच्या सर्वोच्च सविंधानातील कलमात अमेंडमेंन्ट करुन संविधानालाच खिळखिळे करण्याचे कटकारस्थान मनूवादी विचार सरणीची शासनव्यवस्था करतांना दिसत आहे….आपल्या हक्क आणि अधिकाराची लढाई लढणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जात आहे ..
देशातील लोकशाही ला घातक असणारा सत्तासंघर्ष बहूजनांच्या , वंचितांच्या मानगुटीवर बसलेला आहे.सध्या स्थितीतलं महाराष्ट्राचे राजकारण व्यक्तीकेंद्री, पक्षकेद्री बनत चाललेलं आहे
,हूकूमशाही व भांडवलशाही ला खतपाणी घालणारं पोषक वातावरण निर्माण करण्यात येत आहे.
सर्व सामान्य माणसाची गळचेपी होतांना दिसत आहे.
*सत्तेसाठी वाट्टेल ते करून सत्ता काबीज करण्यासाठी समाजात धर्मांध राजकारण करुन निष्पाप लोकांचा बळी घेतला जात आहे,देशात दुषित वातावरण निर्माण करण्यात येत आहे.
सत्ताधा-यांचा सत्तेसाठी चा लंपडाव सर्वसाधारण माणसांचे जगणे मुश्किल करते आहे.दगंली घडवून आणणारे सर्व सामान्य तरुणांचा वापर करतात ,त्यांचे आयुष्य बरबाद करतात आणि आपण मात्र सत्ता उपभोगतात..,.दंगलीत काही जिव जातात, महिलांची अब्रू लुटली जाते , कित्येकांची घरं उध्वस्त होतात,समाजमन सुन्न होऊन जातो, एकंदरीतच मानवतेला काळीमा फासल्या जाते…..अजून बरेच प्रश्न निर्माण केले जाते आहे .सर्वच क्षेत्रात खाजगीकरण करून भांडवलशाही ला जन्म दिला जात आहे .आजचा तरूण भविष्यात देशाचा नेतृत्व करणारा बेरोजगारी च्या सावटाखाली हवालदिल झालेला आहे.शेतक-यांचे प्रश्न ऐरणीवर आहेत , रोजच्याच शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या पेपर ला दिसतायेत.त्यातून मजूर ,कामगारांची तर गोष्ट त्याहून बिकट , वाढलेल्या महागाईमुळे पोट भरणे मुस्किल झाले आहे.
आरोग्य,शिक्षण यांची तर वाताहत….सध्या स्थिती अशी तर भविष्यात येणा-या पिढ्या सुरक्षित राहतील का?????
प्रत्येक*स्त्रिला आपल्या बाळाला जन्म देण्याअगोदर विचार जरुर करावा लागेल ज्या बाळाचं भविष्य सुरक्षित नसेल त्याच्यां जन्म तरी का व्हावा हा विचार येणा-या काळात प्रत्येक महिलेला करावा लागेल तरीही परिस्थिती शी दोन हात करण्याची माणसिकता असली पाहिजे…*मरू तर लढून मरू शस्त्र टाकून नाही*
जात जात ,धर्म धर्म…
धर्मांध रुढी परंपरा..
माणुसकी चा करून चेंदामेंदा…
दया,माया,ममता ,बंधूता…
फक्त शब्द उरलेत..
डोळ्यात क्रूरता,हातात हत्यार..
निष्पापांचे बळी घेती तुझ्यातला सैतान…
महापुरुषांनी तुला माणूस बनवलं,
पण तु त्या महापूरुषांनाच नाही वाचलंस…
कदाचित तु समजल असतं तर ,
तुझ्या हातात लेखनी असती हत्यार नाही…
तु साहेब असतास , गावगुंड नाही…
थरकाप सुटतो,मन घाबरतो…
इतकी कशी रे तुझी विकृत मानसिकता…
रक्ताचे चिथळे उडतांना ,
तुझाही लाल रक्त नसेल आठवलं…
निसर्ग सर्वांना सारखाच…
तिथं तुझं माझं काही नाही..
माणूस म्हणून जगताना
माणुसकीची जाण ठेव…
जातीपातीच्या तोडून भिंती
समतेची तू कास धर,…..
*अशातच एक नेतृत्व पुढे येतो समाजाच्या न्याय हक्कासाठी , मानवतावादी दृष्टिकोन ठेवून देशाच्या हितासाठी पुढाकार घेतो*
*वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष*
*माजी खासदार अँड.आ. प्रकाश यशवंत आंबेडकर अर्थात बाळासाहेब आंबेडकर*
जेव्हा जेव्हा देश अडचणीत सापडला तेंव्हा तेव्हा आंबेडकर नाव पुढे आले ,सकटांला तोंड देण्यासाठी सर्वस्व त्यागले ते विश्वरत्न डांँ .भिमराव रामजी आंबेडकर व आजच्या घडीला रक्ताचे वारस जरी असले तरी विचारांचा वारसा पुढे नेत सविंधानाच्या वाटेवरती मार्गक्रमण करत वयाचे चाळीस वर्ष शोषितांच्या, वंचितांच्या विकासाचे राजकारण करत आहेत.
स्वाभिमान जागृत करून वंचितांना लढण्यासाठी सज्ज करत आहेत.
*बाळासाहेब*
बाळासाहेब म्हणजे नवक्रांतीची पहाट!
बाळासाहेब म्हणजे उगवता सुर्य!!
बाळासाहेब म्हणजे प्रचंड उर्जा , नाविन्य!
बाळासाहेब म्हणजे सततचा संघर्ष!!
बाळासाहेब म्हणजे हरत ,हरत पुन्हा नव्यानं उभं राहणारं व्यक्तीमत्व!
बाळासाहेब म्हणजे व्यवस्थेविरुद्ध पुकारलेले रणशिंग!!
बाळासाहेब म्हणजे स्वातंत्र्य ,समता व बंधुता या तत्वावर आधारित शासनव्यवस्था, समाजव्यवस्था निर्माण करण्याची धडपड!
बाळासाहेब म्हणजे कधी ही स्वत:च्या स्वार्थासाठी कुठलीही तडजोड न करणारे!!
बाळासाहेब म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी पाऊलवाट!
बाळासाहेब म्हणजे अग्नीदिव्य!
बाळासाहेब म्हणजे धगधगती दिव्याची वात!!
बाळासाहेब म्हणजे नवचैतन्य!
बाळासाहेब म्हणजे वंचितांची आस !!
बाळासाहेब म्हणजे निष्कलंक, चारित्र्य संप्पन आचरण !
बाळासाहेब म्हणजे भयाण काळोखानतंर उजाडलेलं प्रकाशपर्व!!
बाळासाहेब म्हणजे आम्हचा आत्मसन्मान!
बाळासाहेब म्हणजे आम्हचा स्वाभीमान!!
बाळासाहेब आम्हची आन ,बान,शान !!!
*बाळासाहेबांचे निर्भिड ,, वैचारिक नेतृत्व
महाराष्ट्रांतील जनतेने स्विकारले आहे* ,
महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्या राजकारणात सुध्दा बाळासाहेबांना महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
आजच्या घडीला बरेच वातावरण तापले असतांना बाळासाहेब नेहमी शांततेच्या मार्गाचा अवलंब करत परिस्थिती आटोक्यात आणतात.नामांतराचा विषय असो ,भिमा कोरेगाव असो किंवा सध्यांचा कोल्हापूर येथील स्टेटस प्रकरण असो , धर्मांध विकृतीला तडा़ देउन मानवता प्रस्थापित करण्यासाठी इतरांची पर्वा न करता बिनधास्त भुमिका घेतात.त्याच्यां प्रदीर्घ वाटचालीचा विचार करता खासदार असतांना सुध्दा व्हि. पी. सिंगाच्या कारकिर्दीत ओ.बी.सी.च्या प्रश्नावर झगडणारे एकमेव नेते……ते आजतागायत लढतच आहेत.एससी, एसटी, माँयनारिटी याच्या हक्क आणि अधिकाराची लढाई सातत्यांने लढत आहेत.बाळासाहेब म्हणतात
*भिक नको सत्तेची ,सत्ता हवी हक्काची*
सहज कोणतेही मत्रींपद मिळत असतांना त्यांना बहूजनांचा लढा महत्वाचा वाटतो…..
*राजकारणात तडजोडी होत असतात मान्य आहे पण कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधून नाही*
महाराष्ट्रात लोकशाही ला घातक सत्ता संघर्ष सुरू असतांना,
अन्याय , अत्याचाराविरोधात लढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मोर्च्याचे आदेश देतात ,ह्या क्षणाला सुध्दा पिडीतांना न्याय मिळावा म्हणून व्यवस्थेशी भांडण्याचे बळ प्रत्येक कार्यकर्त्यात यावे यासाठी स्वतः नेतृत्व करतात.
बाळासाहेबांच्या बाबतीत लिहण्याएवढी मी मोठी नाही पण माझी सद्सद्विवेक बुध्दी मला स्वस्थ बसू देत नाही म्हणून हा छोटासा लेख प्रपंच….
✒️सुनिता टेंभूर्णे(निरीक्षक, वंचित बहूजन महिला आघाडी,भंडारा-गोंदिया जिल्हा)मो:-9405511177