✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि. 14 जुलै) तालुक्यातील पिंपळवाडी येथील अवैध रेती वाहतूक करताना युवक पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे.
दि. 14 जुलै 2023 रोजी गुप्त बातमीदारा कडून मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे वैभव विठ्ठल गव्हाळे वय 25 वर्ष रा.पिंपळवाडी ता.उमरखेड हा अवैध्य रेती वाहतूक करताना मिळून आला.
त्यास ताब्यात घेत त्याच्या जवळील फार्म ट्रॅक कंपनीचे ट्रॅक्टर ज्याचा नं एम एच 29/बिव्ही 11 17 त्याला जोडून असलेली निळ्या रंगाची ट्राली कि 5,50,000/-रु व एक ट्राली भरून रेती कि 6000/-रु. असा एकूण 5,56,000/-रु चा मुद्देमाल मिळून आला.
बातमी पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक श्री डॉ.पवन कुमार बन्सोड, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक श्री पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रदीप पाडवी यांचे मार्गदर्शनात बिटरगाव ठाणेदार सपोनी .सुजाता बन्सोड सोबत NPC खरात, PC कुसराम, PC मुंडे, पोलीस स्टेशन बिटरगाव नी केली.