


🔹महामार्गाचे अर्धवट काम तरीही होणार टोल वसुली !
🔸निंभी येथील टोलनाका रद्द न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आंदोलनाचा इशारा !
✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)
मोर्शी(दि.14जुलै):-नांदगावपेठ मोर्शी वरूड पांढूर्णा राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण असतांनाही वरूड मोर्शी अमरावती राष्ट्रीय महामार्गावर निंभी येथे टोल नाक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने परिसरातील नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या महा मार्गावरून मोर्शी वरूड तालुक्यातील लोक मोठ्या संख्येने अमरावती ये-जा करीत असताना नांदगाव पेठ येथील टोल नाक्यावर ८ किलोमिटर करीता शेकडो रुपये टोल वसुल करून मोर्शी वरूड तालुक्यातील नागरिकांना भुर्दंड सोसावा लागत असतांना आता पुन्हा नींभी येथे टोल नाका सुरू करून वाहन धारकांची लूट होणार असल्यामुळे निंभी येथील टोल नाका रद्द न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निंभी येथील टोल नाका सुरू करून टोल वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, नियमाप्रमाणे ७० किलो मीटरपर्यंत रस्ता व्यवस्थित असेल तरच टोल आकारता येतो. या महामार्गाचे काम पूर्ण झाले नसतानाही जाणीवपूर्वक टोल आकारला जाणार असेल तर त्याला पूर्णपणे विरोध असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी व्यक्त केले. नांदगावपेठ मोर्शी वरूड पांढुर्णा पर्यंतचे काम हाती घेऊन अनेक वर्ष झाले. आतापर्यंत विविध कारणांनी महामार्गाचे काम अर्धवट आहे.त्यामुळे नांदगावपेठ मोर्शी वरूड पांढुर्णा पर्यंत ये-जा करताना वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. वन खात्याने परवानगी देऊन सुद्धा काम लवकर पूर्ण केले जात नाही. त्यामुळे वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आधी रस्त्याचे व पुलांचे काम पूर्ण करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांच्या तर्फे करण्यात आली आहे .
निंभी येथे टोलनाका सुरू करताना परिसरातील नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे होते. मात्र, ऐनवेळी टोल नाक्याचे काम सुरू करून टोल आकारला जाणार असल्याची माहिती मिळत असल्याने मोर्शी वरूड तालुक्यातील नागरिकांना ६० किलोमिटर साठी २ टोल नाके भरावे लागणार असल्यामुळे नागरिकांची आर्थिक लूट होणार आल्यामुळे नागरीकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. याची दखल घेऊन महामार्ग प्राधिकरणाने टोल नाका रद्द करावा अशी आमची मागणी आहे. — रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.
या महामार्गाचे काम पूर्ण झाले नसतानाही जाणीवपूर्वक टोल आकारला जाणार असेल तर त्याला पूर्णपणे विरोध असून निंभी येथील टोल नाका रद्द झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. या टोल नक्या विरोधात लवकरच पुढील निर्णय घेणार आहे. डॉ प्रदीप कुऱ्हाडे माजी शिक्षण सभापती नगर परीषद मोर्शी.













