Home यवतमाळ कोपरा फाट्याजवळ सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिकाचा अपघाती मृत्यू (शेतीच्या कामासाठी शेलू येथे...

कोपरा फाट्याजवळ सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिकाचा अपघाती मृत्यू (शेतीच्या कामासाठी शेलू येथे जातांना दुर्दैवी मृत्यू)

274

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

यवतमाळ/पुसद (दि.11जुलै)
पुसद उमरखेड रोड वरील कोपरा फाट्याजवळ दि.10 जुलै 2023 रोजीच्या 12:15 वाजताच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिका चा मृत्यू झाला आहे.

सेवानिवृत्ती लिपिकाचा मृत्यू झाल्या प्रकरणी संस्थेचे सचिवाने शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.संस्थेच्या कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरला आहे.

वसंत किसन राठोड 62 वर्ष रा.सप्तगिरी नगर असे मृत झालेल्या वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे.युवक मंडळ शिक्षण संस्थेचे सचिव विजय कनिराम जाधव वय 53 वर्षे यांनी फिर्याद दिली आहे.

शहर पोलीस स्टेशनच्या सूत्रांकडून मिळालेल्या वसंता राठोड हे युवक मंडळ शिक्षण संस्थेमध्ये वरिष्ठ लिपीक पदावर नोकरी करत होते.

ते अंदाजे 4 ते 5 वर्षापुर्वी वरिष्ठ लिपीक पदावरुन सेवानिवृत्त झाले.निवृत्ती नंतर ते शेलु येथील चार एकर शेती वाहत होते.घटनेच्या दिवशी दुपारी 12.15 वाजताच्या दरम्यान शेतीचे काम पाहण्यासाठी सप्तगिरी नगर येथील राहत्या घरून कोपरा फाट्याजवळील बोजेवार यांच्या शेता जवळून शेलू येथे दुचाकी क्रमांक एमएच 29 एयु 7432 ने जात होते.

अशावेळी अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून ऍक्टीव्हाला धडक दिली .त्या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्या कानातून रक्तस्त्राव सुरू झाला .अशा अवस्थेमध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.त्यांच्या परिवारामध्ये त्यांची पत्नी सुभद्राबाई राठोड व एक मुलगा व एक मुलगी असे आहेत.

अज्ञात वाहन चालका विरोधात शहर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले असून अज्ञात वाहनाचा शोध शहर पोलिसांकडून घेतल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here