जिल्हा प्रतिनिधी /सिध्दार्थ दिवेकर
दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौध्द महासभा यवतमाळ जिल्हा पूर्व व पश्चिम चे वतीने आज दि. 9/7/2023 ला बोधिसत्व बुध्द विहारात चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम तथागत भगवान बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांचे पुजन पुष्पहाराने मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलित करुन करण्यात आले. आणि सामुहिक त्रिसरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रवि भगत होते या कार्यक्रमाचे उद्घाटन भगवान इंगळे अध्यक्ष यांनी केले मंचावर राहुल राऊत कोषाध्यक्ष उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन व्हि.डी.हिवराळे केंद्रीय शिक्षक मुंबई यांनी कार्यकर्त्यांची आचारसंहिता व हिशोबातील एकसुत्रता लेखापध्दती सभासद मोहीम या विषयावर प्रकाश टाकला रूपेश वानखडे-सरचिटणीस यांनी धम्मक्रांती कशी गतीमान करावी यावर सविस्तर मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे संचलन सुध्दा केले. यावेळी यवतमाळ -दारव्हा-दिग्रस-पुसद-उमरखेड-महागाव – आर्णि-घाटंजी – वणी -कळंब- पांढरकवडा- मारेगाव ईत्यादी तालुक्यातील पदाधिकारी केंद्रीय शिक्षक तथा केंद्रीय शिक्षिका व बौद्धांचार्य उपस्थित होते.या सर्व तालुका पातळीवर सभासद मोहीम राबविण्यासाठी सभासद पावती पुस्तकाचे वितरन केले. या कार्यक्रमाचे आभार रंजनाताई ताकसांडे उपाध्यक्ष जिल्हा शाखा यवतमाळ यांनी केले शवटी सरणतयं गाथेने या कार्यक्रमाची सांगता झाली.
—— पुरोगामी संदेश व पुरोगामी एकता हे दोन्ही साप्ताहिक (प्रिंट), न्युज पोर्टल, ई-पेपर आहेत, या दोन्ही प्रसारमाध्यमा करिता महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा व तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहे, सविस्तर माहिती करिता मो. 8605592830 वर संपर्क साधावा- संपादक