Home महाराष्ट्र घेतले ओले करून

घेतले ओले करून

109

कोरडे होण्या आधी मी
घेतले सिंचन करून
पावले देवेंद्र स्वर्गी
घेतले ओले करून…

उठू द्या उठेल ज्यांचे
उठेल तितके… पोटशुळ
मी आता सामील झालो
घेऊन हाती हे त्रिशूळ…

जातो जिथे , जिथे तिथे
जाणतो इथे , हित आहे
यार हो तुम्ही जाणता
जित जित मी अजित आहे…

✒️कवी:-सुधाकर लोमटे(उमरखेड)मो:-8625856081

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here