Home महाराष्ट्र शाळेला मुख्याध्यापक व नियमीत शिक्षक द्या अन्यथा शाळा बंद आंदोलन करू

शाळेला मुख्याध्यापक व नियमीत शिक्षक द्या अन्यथा शाळा बंद आंदोलन करू

173

🔸मांडवी येथील शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी यांचा इशारा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा (दि.9 जुलै ):-जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकाची रिक्त जागा व नियमित वर्गशिक्षक लवकर भराव्यात अशी मागणी भंडारा जिल्ह्यातील मांडवी गावातील शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी यांनी केली असून लवकर जागा भरल्या नाही तर शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रभारी मुख्याध्यापक सौ. रेखा राजु दलाल यांची तक्रारीनुसार दुसरीकडे तात्पुरते स्थानांतरण केले. परंतु त्यांचे जागेवर आजपर्यंत नियमीत शिक्षक दिले नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचा शैक्षणिक नुकसान होत आहे. सदर पद दि. 20/09/2022 पासून आजपर्यंत रिक्त आहे.

त्याचप्रमाणे मुख्याध्यापकाचे पद सुदा रिक्त असल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. गावाजवळ खाजगी प्रशासनाची शाळा असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतुन पालक टिसी मागुन विद्यार्थी नेत आहे. त्यामुळे शाळेची पट संख्या कमी होत आहे.
यापूर्वी या विषयावर अनेकदा भेट घेतलेली असुन शिक्षणाधिकारी (प्राथ.) भंडारा यांच्याकडून या विषयीची पूर्तता झालेली नाही. दि. 10/07/2023 पर्यंत शिक्षकाची पूर्तता करण्यात यावी. शिक्षकाची पुर्तता न झाल्यास दि. 11/07/2023 पासून शाळा बंद आंदोलन करण्यात येईल.

होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी जबाबदार राहणार नाही. निवेदनाची प्रत मा. शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद, भंडारा, मा. गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, भंडारा,आमदार भंडारा विधानसभा क्षेत्र , मा. सभापती पंचायत समिती, भंडारा, मा. जिल्हाधिकारी, जिल्हा भंडारा,मा. मुख्य कार्यपालन अधिकारी, जि. प. भंडारा , मा. खंडविकास अधिकारी, पं. स. भंडारा, मा. ठाणेदार ग्रामीण पोलीस स्टेशन कारधा यांना दिली असल्याची माहिती मांडवी येथील शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी यांच्या कडून निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here