Home महाराष्ट्र युवा उद्योजक सुनील (भैय्या) गुट्टे यांच्या पाठीवर देवेंद्र फडणवीसांनी टाकली कौतुकाची थाप!

युवा उद्योजक सुनील (भैय्या) गुट्टे यांच्या पाठीवर देवेंद्र फडणवीसांनी टाकली कौतुकाची थाप!

206

🔸उपक्रमांची घेतली दखल : शासनाकडून सहकार्याचे आश्वासन

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.8जुलै):-महाराष्ट्रातील बेरोजगारी दूर व्हावी, विद्यार्थी, युवक, युवती, नागरिक, महिला, शेतकरी अशा विविध घटकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जावेत अशा हेतूने पिनाकी एमप्रासेस प्रा.लि. कंपनीची पुणे येथे युवा उद्योजक सुनील (भैय्या) गुट्टे यांनी स्थापना केली आहे.त्यानंतर शिक्षण, रोजगार, करिअर आणि उद्योग क्षेत्रात कंपनीने लोकोपयोगी अनेक कार्यक्रम सातत्याने राबविले आहेत. सामाजिक बांधिलकीचा वसा आणि वारसा जोपासला आहे. पालघर ते अचलपूर पर्यंत रोजगार मेळावे, उद्योग मंथन आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रम यशस्वीपणे घेतले आहेत.

गंगाखेड विधानसभा कार्यक्षेत्रात सुध्दा सुनील (भैय्या) गुट्टे यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. त्याचा फायदा विविध सामाजिक घटकांना झाला आहे. नुकतेच त्यांनी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम, नौकरी मेळावा आणि उद्योग मंथन महा-महोत्सव मेळावा असे कार्यक्रम यशस्वीपणे घेतले आहेत. त्याची संपूर्ण मतदारसंघात चर्चा होत आहे. त्यांनी केवळ गंगाखेड नव्हे तर पुणे, पालघर, रायगड, अचलपूर, मेळघाट सारख्या ग्रामीण व दुर्गम भागातही विविध उपक्रम घेतले‌ आहेत.

परिणामी, मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी सन्मानचिन्ह देऊन युवा उद्योजक सुनील (भैय्या) गुट्टे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. आपुलकीने विचारपूस केली आणि इथून पुढे अशा उपक्रमांसाठी पिनाकी एमप्रासेस प्रा.लि कंपनीस सर्वतोपरी सहकार्य आणि पाठबळ देईल, असा शब्द दिला आहे.याप्रसंगी युवा उद्योजक सुनील (भैय्या) गुट्टे यांच्यासह आ.डॉ.रत्नाकर गुट्टे, पिनाकीचे संचालक श्रीराम सातपुते उपस्थित होते.भारावून गेलोय, निशब्द झालोयपालघर आणि मेळघाट किंवा गंगाखेड सारख्या ग्रामीण भागात घेतलेल्या एखाद्या उपक्रमाची नोंद राज्याचे उपमुख्यमंत्री घेतात. कौतुक करतात.

शासनाकडून सहकार्य करण्याचा शब्द देतात. हे सारं विलोभनीय आहे. शब्दांपलीकडचे आहे. त्यामुळे मी भारावून गेलोय. निशब्द झालोय.‌ मी केवळ निमित्तमात्र असून हा झालेला सन्मान माझा एकट्याचा नसून मी मांडलेल्या संकल्पनेला पाठबळ देऊन मार्गदर्शन करणारे माझे वडील गंगाखेड विधानसभेचे विद्यमान आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब आणि माझ्या सोबत राबणाऱ्या सर्व हातांचा आहे. या कौतुकाने जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यामुळे भविष्यात सुध्दा कंपनी सर्व समाज घटकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम घेत‌ राहील, असा विश्वास सत्कारमूर्ती युवा उद्योजक सुनील (भैय्या) गुट्टे यांनी व्यक्त केला आहे. 

🔸पुरोगामी संदेश व पुरोगामी एकता हे दोन्ही साप्ताहिक (प्रिंट), न्युज पोर्टल, ई-पेपर आहेत, या दोन्ही प्रसारमाध्यमा करिता महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा व तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहे, सविस्तर माहिती करिता मो. 8605592830 वर संपर्क साधावा- संपादक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here